आळंदीत श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधीवर शुक्रवारी रामनवमीनिमित्त चंदनउटीतून श्रींचे िशदेशाही पगडी अवतारातील वैभवीरूप साकारण्यात आले. माउलींचे हे राजिबडे रूप पाहण्यासाठी संजीवन समाधी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.
माउली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गुढीपाडव्यापासून माउलींच्या समाधीवर चंदनउटीचा लेप लावण्यास सुरुवात होते. रामनवमीनिमित्त संजीवन समाधीवर चंदनउटी व आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रींचे वैभवी रूप श्रींचे पुजारी सुधीर गांधी परिवाराने परिश्रमपूर्वक साकारले. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थानच्या प्रथेप्रमाणे मंदिरात राम नवमीचे नियोजन केले. मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती व गुढी पूजन झाले. दरम्यान भाविकांच्या पूजा होऊन गाभारा दर्शनास खुला करण्यात आला. त्यानंतर चंदनउटी दर्शन खुले झाले.
रामजन्मोत्सवानिमित्त श्रींना वैभवी पोशाख करण्यात आला. वीना मंडपात मानकरी संतोष मोझे यांच्या वतीने विश्वस्त डॉ. अभय टिळक यांची कीर्तन सेवा झाली. जन्मोत्सव कीर्तन-पाळणा, आरती, महानवेद्य, सुंठवडा प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळप्रसाद वाटप करण्यातआले. जन्मोत्सवानंतर श्रींचे दर्शन खुले करण्यात आले. प्रथेप्रमाणे माउलींच्या संजीवन समाधीवर गांधी परिवाराने चंदन उटीतील िशदेशाही पगडीतील वैभवी राजिबडे रूप साकारत पूजा बांधली. आवेकर-भावे श्रीराम मंदिर संस्थानचे वतीने उत्साहात श्रीरामाची पालखी माउली मंदिरप्रदक्षिणा आणि नगरप्रदक्षिणा झाली. श्रीराम पालखीचे मंदिरात स्वागत करून नारळप्रसाद देण्यात आला.