25 February 2021

News Flash

Coronavirus : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व परमिट रूम, बार, रेस्तराँ, क्लब ३१ मार्चपर्यंत बंद

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांचे आदेश

प्रतिकात्मक छायाचित्र

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व परमीट रूम, बार आणि रेस्टॉरंट, क्लब ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) अर्थात परमीट रूम, फॉर्म ई/ ई -2/ अर्थात बार व रेस्टॉरंट, एफएल-4 (कायमस्वरूपी) एफएल-4 (तात्पूरती) अर्थात क्लब या परवानाधारकांचे व्यवहार १८ मार्च ते ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशाअंतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी देशात सर्वत्र प्रवास करत आहेत. असे प्रवासी पुणे जिल्हयात परदेश प्रवास करून आलेले आहेत व त्यातील बरेच प्रवाशी परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोरोनो विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधीक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे, अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे या बाबी टाळणे आवश्यक आहे. विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम-142 नुसार पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व परमीट रूम, बार आणि रेस्टॉरंट, क्लबमधील व्यवहार १८ मार्च ते ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन, 1949 व त्या अंतर्गत असलेल्या कलम व नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 4:36 pm

Web Title: all permit rooms bars restaurants clubs in pune pimpri chinchwad are closed till march 31 march msr 87 svk 88
Next Stories
1 पुणे : मार्केट यार्डच्या ‘फळे-भाजीपाला व कांदा – बटाटा’ बाजाराबाबत महत्त्वाचा निर्णय
2 Coronavirus: पुढील काही दिवस पुण्यातील सर्व हॉटेल आणि सलूनही राहणार बंद
3 Coronavirus: एरव्ही उभं राहण्यासाठी जागा नसणाऱ्या डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेसमध्ये शुकशुकाट
Just Now!
X