राज्यातील करोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील १५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या काळात राज्यातील सर्व ५०७ दस्त नोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत. दस्त नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन आगाऊ वेळ आरक्षित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संचारबंदीच्या काळात सर्व दस्त नोंदणी कार्यालये ही सुरूच राहणार आहेत. याबाबत बोलताना सहनोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, ‘राज्यातील सर्व दस्त नोंदणी कार्यालये संचारबंदीच्या काळात सुरू राहणार आहेत. या काळात दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्तनोंदणी करण्यापूर्वी ऑनलाइन वेळ आरक्षित करणे बंधनकारक आहे. करोना विषयक सुरक्षेचे सर्व नियम पाळून दस्त नोंदणी करण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत. तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संके तस्थळावर ऑनलाइन भाडेकरार (लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स ई-रजिस्ट्रेशन) करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ऑनलाइन भाडेकरारांच्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष येऊन होणार नाही.’

Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली
Municipal Corporation will fill the contract semi-medical staff on a temporary basis
महानगरपालिका तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी निमवैद्यकीय कर्मचारी भरणार

दरम्यान, सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच ९.४५ ते ६.१५ या वेळेत सुरू राहील. नागरिकांनी स्वत:चे पेन आणावे, एकच पेन दोन किं वा इतर नागरिकांनी वापरू नये, मुखपट्टी लावल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही, असेही खिलारी यांनी स्पष्ट केले.

वेळ अशी आरक्षित करा : नागरिकांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संके तस्थळावर दस्त नोंदणीसाठी पब्लिक डाटा एण्ट्रीद्वारे (पीडीई) डाटा एण्ट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे दुय्यम निबंध कार्यालयातील डाटा एण्ट्री किं वा दुरुस्त्या पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पीडीई डाटा एण्ट्री करून दस्त नोंदणीसाठी विभागाच्या संके तस्थळावरील ‘ई-स्टेपइन’ या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोयीची वेळ आरक्षित करून किं वा कार्यालयीन दूरध्वनीवर समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य आहे.