News Flash

शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा?

पाणी नियोजनासंदर्भात आज बैठक

पाणी नियोजनासंदर्भात आज बैठक

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणांतील पाणीसाठा झपाटय़ाने कमी झाल्यामुळे पाणीकपातीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा आढावा घेण्याबरोबरच पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात आज (मंगळवार, ४ ऑगस्ट) महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत एक दिवसाआड पाणी किं वा अन्य पर्यायांबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

महापालिके च्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांबरोबर महापालिके त ही बैठक होणार आहे.  दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दिवसाआड पाणीपुरवठा किं वा पाणीपुरवठय़ाच्या वेळांमध्ये कपात करण्याचे महापालिके च्या विचाराधीन आहे.

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरणांत तब्बल १६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शहरावरील पाणीकपातीचे संकट आणखी गडद झाले आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत असताना पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना यापूर्वीच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्या आहेत.

खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, टेमघर, वरसगांव आणि खडकवासला या चार धरणांतून शहराला पाणीपुरवठा के ला जातो. सध्या या चारही धरणांत मिळून ९.८२ टीएमसी एवढाच पाणीसाठा आहे. गतवर्षी हा साठा तब्बल २५.८६ टीएमसी एवढा होता. शहराला प्रति महिना साधारणत: १.५० टीएमसी पाणी लागते.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस होईल. त्यामुळे तूर्त काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असा दावा महापालिके तील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी करत आहेत. मात्र जलसंपदा विभागाने पाणी काटकसरीने वापरण्याचा इशारा दिल्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करायचा की अन्य पर्याय निवडायचे, हे मंगळवारी निािचत के ले जाणार आहे.

शेतीसाठी यंदा दोन वेळा आवर्तन

जलसंपदा विभागाकडून यंदा दोन वेळा शेतीसाठी आवर्तन घेण्यात आले आहे. पहिले उन्हाळी आवर्तन हे ३१ मार्चपासून ४० दिवसांसाठी धेण्यात आले. या कालावधीत मुठा उजवा कालव्यातून ५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. २१ मे पासून दुसरे आवर्तन सुरू करण्यात आले. ते १५ जूनपर्यंत सुरू ठेवण्यात येणार होते. या आवर्तन काळात ३. ७८ टीएमसी पाणी सोडण्यात आले.

धरणामधील उपलब्ध पाणीसाठय़ानुसार नव्याने नियोजन के ले जाणार आहे. महापालिके बरोबर होणाऱ्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाईल.

– विजय पाटील,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 2:43 am

Web Title: alternate day water supply in the pune city zws 70
Next Stories
1 उद्योगनगरीतील पिस्तूल विक्रीचा धंदा तेजीत
2 मॉलला परवानगी मात्र व्यापाऱ्यांवर निर्बंध
3 राज्यावर जलसंकट
Just Now!
X