प्रचारातील शेवटचा रविवार असल्याचे औचित्य साधून सर्वच उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला. भाजप उमेदवारांसाठी नवज्योतसिंह सिद्धू यांची रॅली काढण्यात आली. तर, शिवसेनेच्या उमेदवारांसाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर सभा घेतली. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आपण अजूनही पक्षातच असल्याचे सांगत काँग्रेस उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. तर, काँग्रेस नेते व माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप व एकनाथ पवार यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी सिध्दू शहरात आले होते. चिंचवड व भोसरीतील मतदारांशी त्यांनी रॅलीद्वारे संपर्क  साधला. शिवसेनेचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ डॉ. कोल्हेंची सभा झाली. खासदार श्रीरंग बारणे, उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर आदी  उपस्थित होते. भोईरांनी समर्थकांची बैठक घेऊन आपण काँग्रेस पक्षातच असल्याचे जाहीर केले. मूलचंदानी यांनी गुजरातचे कायदामंत्री प्रदीपसिंह जडेजा व शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मूलचंदानी हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक असून सेवाविकास बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षांतरामुळे पिंपरीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आमदार विलास लांडे यांनी पदयात्रांद्वारे, तर आमदार अण्णा बनसोडे यांनी रॅलीद्वारे संपर्क साधला. भोसरी ग्रामस्थांच्या बैठकीत महेश लांडगे यांना पािठबा दिला. पिंपरीतील शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्यासाठी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत आकुर्डी येथे सभा झाली.

Amravati, Vanchit Bahujan Aghadi,
अमरावतीत ‘वंचित’मध्‍ये फूट; जिल्‍हाध्‍यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
rahul gandhi
काँग्रेसच्या अमेठीतील उमेदवाराबाबत संदिग्धता
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
Sevak Waghaye
“नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”