16 January 2021

News Flash

करोना: १०० देशांच्या राजदुतांचा सिरम इन्स्टिट्युटचा दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या करोना व्हायरसला रोखणाऱ्या करोना प्रतिबंधक 'कोव्हिशल्ड' लसीची निर्मिती सीरमकडून सुरु आहे.

जगभरात करोना विषाणू आजाराने थैमान घातले आहे. या आजारावरील लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी कंपनीला भेट देणार आहेत. तर त्यानंतर ४ डिसेंबर रोजी १०० देशांचे राजदूत देखील कंपनीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार होते. मात्र काही कारणास्तव ४ डिसेंबरचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशिल्ड लस तयार करण्यात येत आहे. त्या लशीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी हे दुपारी १ ते २ या वेळेत येणार आहेत. त्यावेळी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी मोदी संवाद साधणार आहेत. तर ४ डिसेंबर रोजी १०० देशांचे राजदूत देखील या ठिकाणी येऊन कोविड लशीबाबत सद्य परिस्थितीचा आढावा घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र हा नियोजित दौरा काही कारणास्तव रद्द झाला असल्याची माहिती राज शिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 6:05 pm

Web Title: ambassadors of 100 countries visit serum institute canceled scj 81 svk 88
Next Stories
1 राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट
2 पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
3 मोदींचा पुणे दौरा : सीरम इन्स्टिटय़ूट परिसरातील बंदोबस्त वाढवला
Just Now!
X