News Flash

पुणे : कोविड सेंटरला जाणाऱ्या अँब्युलन्सचा अपघात, १२ जणं जखमी

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झाला अपघात

छायाचित्र सौजन्य - पवन खेंगरे

१२ जणांना घेऊन कोविड सेंटरमध्ये जाणाऱ्या अँब्युलन्सचा अपघात झाला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर सोमवारी दुपारी हा अपघात घडला असून यात १२ जणं जखमी झाले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही अँब्युलन्स एका दिशेला झुकल्याने हा अपघात झाला. अँब्युलन्समध्ये बसलेल्या व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोथरुडमधील जय भवानी नगर आणि किश्कींदा नगर भागातून ही अँब्युलन्स १२ जणांना घेऊन बालेवाडी येथील कोविड सेंटरमध्ये जात होती.

अँब्युलन्समधील लोकं करोनाग्रस्त होती का याबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली नाही. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी अँब्युलन्समधील व्यक्तींना बाहेर काढत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 7:06 pm

Web Title: ambulance on way to covid facility turns on its side 12 hurt psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या
2 “…आता ढोलकीवर पुन्हा कधी थाप बसेल माहीत नाही; सरकारने हाताला काम द्यावं”
3 घर चालवण्यासाठी नृत्यांगनेवर आली दुसऱ्याच्या शेतात काम करण्याची वेळ
Just Now!
X