पुण्यातील खडकी येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. अशोक डूबल आणि मारिया रॉक असे या कामगारांची नावे आहेत. या दुर्घटनेत अन्य दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्फोट हा अपघात घडला. स्फोटक वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात असताना हा अपघात झाल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सकाळी कामगार काम करत असताना साडे नऊच्या सुमारास दोन स्फोटक वस्तू हाताळताना ही घटना घडली. ही वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात असताना हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यात दोन जणाचा जागीच मृत्यू झाला तसेच दोन जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेसंदर्भात आधिक तपास करण्यात पोलीस करत आहेत.

Swimmer dies after drowning in lake
नागपूर : धक्कादायक! पोहण्यात तरबेज तरूणाचा तलावात बुडून मृत्यू
bhaindar accident marathi news, bhaindar slab collapsed marathi news
भाईंदर मध्ये स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी
Agnel School, 17 Year Old Student, Drowns in Navi Mumbai, Swimming Pool, 17 Year Old Student Drowns, Agnel School Student Drowns, Student Drowns Swimming Pool, vashi Agnel School, marathi news,
नवी मुंबई : शाळेतील विद्यार्थ्यांचा तरण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू
US Influencer killed husband children
महिला ज्योतिष एन्फ्लुएन्सरने पती अन् मुलांचा खून करून स्वतःला संपवलं, सूर्यग्रहण ठरलं निमित्त