अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पण त्याआधी ते एक उत्तम अभिनेते आहेत. अमोल कोल्हे यांचं वक्तृत्वकौशल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ते ज्या राजकीय पक्षात असतात, त्या राजकीय पक्षांच्या सभांसाठी त्यांना उपस्थित राहण्याचा आणि बोलण्याचा आग्रह केला जाणं स्वाभाविक आहे. अशीच एक मजेशीर आठवण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्याबद्दल एक मजेशीर आठवण सांगितली. विधासभेच्या निवडणुकांवेळी नक्की काय घडलं याबद्दलचा एक खुमासदार किस्सा जयंत पाटील यांनी सांगितला. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

“चिकनचं आमिष दाखवून रक्तदान शिबीर भरवणं म्हणजे…”

“खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणाचे व्हिडिओ (क्लिप) खूप पाहिले जातात. त्यांनी मांडलेले मुद्दे योग्य आहेत हे बघणाऱ्यालाही समजतं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यावेळी डॉ. अमोल कोल्हे हे पुण्यात हवे आहेत, त्यांना महाराष्ट्रभर फिरवू नका, अशी या भागात प्रचंड मोठी तक्रार माझ्याबद्दल आणि पक्षाबद्दल होत होती. अमोल कोल्हे यांना आमच्याकडे सोडावं, असं म्हणत अमोल कोल्हे यांच्यासाठी ओढाताण होत होती. तेव्हा मी कोल्हेंना म्हटलं की तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसा आणि मागे वळून अजिबात बघू नका. कोणत्याही प्रकारची चिंताही करू नका. कोणाला काय ओरडायचं असेल ते ओरडू द्या. एकदा विधानसभेचे निकाल हाती आले की मग मात्र मी तुम्हाला मतदारसंघ सोडून कुठेही घेऊन जात नाही, अशी आठवण त्यांना सांगितली.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या घरी बोलावून डिसले यांचा सत्कार करणं म्हणजे…”

“डॉ. अमोल कोल्हे हे महाराष्ट्रभर प्रचारासाठी हवे होते. व्यासपीठावर ते असावेत यासाठी ओढाताण होत होती. पण आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला. त्यांना घेऊन महाराष्ट्रभर फिरल्यावर जे यश मिळालं आहे, त्या यशात मोठा वाटा त्यांचाच आहे”, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.