X
X

पुण्यात ‘कोयता गँग’कडून भरदिवसा दहशत पसरवण्याचा प्रयत्न

याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील लष्कर भागातील काही दुकानांमध्ये एका टोळक्याकडून हातामध्ये कोयते घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे लष्कर भागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य ऊर्फ मन्या भोसले याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी लष्कर भागातल्या न्यू मोदीखाना भागातल्या गुडलक चौकातील काही दुकानदारांकडून हातात कोयते घेऊन भीती दाखवून हप्ते घेण्याचा प्रयत्न केला होता.

काही दुकान चालकांनी त्यांना हप्ता देण्यास नकार दिल्याने त्यांनी दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर दुकानदारांच्या तक्रारीवरुन या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: May 15, 2019 6:07 pm