01 March 2021

News Flash

मुलांना गळफास देऊन आईची आत्महत्या; घटनेस वेगळे वळण

मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड

प्रतिनिधिक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये आईने तीन मुलांना गळफास देऊन स्वतः आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना रविवारी घडली होती. मात्र, आता या घटनेने वेगळे वळण घेतले असून या घटनेतील मृत दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब शवविच्छेदन अहवालात समोर आली आहे. याप्रकरणी एका नातेवाईकास भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मृत आईवर संशयावरून खुनाचा गुन्हा भोसरी पोलिसांनी दाखल केला असल्याची माहिती राम जाधव (सहायक पोलीस आयुक्त) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भोसरीमध्ये तीन मुलांना फाशी देऊन स्वतः जन्मदात्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ माजली होती. मृत महिलेच्या पतीचा फळ विक्रीचा व्यवसाय असून त्यांना यामध्ये नेहमी तोटा सहन करावा लागत होता. यातून त्यांचे अनेकदा किरकोळ वादही झाले. रविवारी पती बाहेर गेल्यानंतर २८ वर्षीय महिलेने मुलांना गळफास देऊन त्यांना मारले व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. दरम्यान, आईनेच मुलांना मारले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला असून, याबाबत भोसरी पोलीस तपास करत आहेत. मृत आईवर संशयावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका संशयीत नातेवाईकास ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 6:44 pm

Web Title: an autopsy report revealed that girls were sexually assaulted msr 87
Next Stories
1 भाजपा प्रवेश देणे आहे, पुण्यात पोस्टरच्या माध्यमातून टोलेबाजी
2 पुणे: राजकीय भूमिका घेऊ नका, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा
3 पुणे: बीपीओ कर्मचारी बलात्कार, हत्या प्रकरण; आरोपींची फाशी उच्च न्यायालयाकडून रद्द
Just Now!
X