पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध असलेल्या अमनोरा सिटी कॉर्पोरेशन कंपनीला एका कर्मचाऱ्याने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अमनोरा सिटी कॉर्पोरेशन कंपनीमध्ये आरोपी आशिष शेळके हा २०१० पासून कामाला होता. आरोपी आशिष कंपनीला मिळणार्‍या कमिशनची रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा करत नव्हता. मात्र गेल्या दहा वर्षात हा प्रकाराची कुणालाही कुणकुण लागली नाही. मॅनेजर अतुल गोगावले यांच्या नावाने बनावट सही करून त्याने विविध बॅंकेत खाती उघडली होती. त्याचा कमिशन कोड देखील तयार केला होता. त्यामधून तो सतत पैसे काढत राहीला. हा सर्व प्रकार समोर येताच आरोपी आशिष शेळके विरोधात सुनील तरटे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध सुरु केला आहे. या सध्यात तरी ४० ते ५० लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे.

पिंपरीत सहा कोटींचं रक्तचंदन पकडलं; WhatsApp मुळे बिंग फुटलं !

आरोपी आशिष शेळके हा फरार असून त्याच्या शोधासाठी टीम रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आर. आर. पाटील यांनी दिली आहे.