News Flash

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग रोखणाऱ्या १७५ आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी आता तळेगाव पोलिसात १५० ते १७५ आंदोलकांवर जमाव जमवणे,रस्ता अडवणे,हायवे ऍक्ट ८ बी असे इतर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उर्से टोल नाका या ठिकाणी मराठा आंदोलकांनी ९ ऑगस्टला सहा तास ठिय्या आंदोलन केले

९ ऑगस्टला उर्से टोल नाका याठिकाणी मराठा आंदोलकांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सहा तास रोखून धरला होता. आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यात सकल मराठा क्रांती मोर्चाकडून गुरुवारी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती.याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ग्रामिण भागासह शहरात बंद ला पाठिंबा मिळाला.गुरुवारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गा देखील  मराठा आंदोलकांनी अडवला होता,त्यामुळे अनेक वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता.यासंदर्भात तळेगाव पोलिसात १५० ते १७५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

टाळ आणि मृदंगाच्या गजरात हे आंदोलन सुरू होते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा तब्बल सहा तास रोखला गेला. संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यानी बंद ची हाक दिली होती.लोणावळा रेल्वे स्थानकात एक्सप्रेस अडवली गेली होती.तर मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गा उर्से टोल नाका येथे शेकडोच्या संख्येत आंदोलकांनी रास्ता रोको केला.यावेळी आंदोलकांनी टाळ मृदंग आणि भजन कीर्तन करत सरकारचा निषेध केला. या प्रकरणी आता तळेगाव पोलिसात १५० ते १७५ आंदोलकांवर जमाव जमवणे,रस्ता अडवणे,हायवे ऍक्ट ८ बी असे इतर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 4:08 pm

Web Title: an fir has been lodged against 175 protesters who have blocked the mumbai pune expressway
Next Stories
1 धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुण्यात लाक्षणिक उपोषण
2 व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी चित्रपट अनुदानासाठी अपात्र ठरणार !
3 रस्ते खोदकाम महागात!
Just Now!
X