News Flash

आनंद भाटे, सुधीर गाडगीळ यांना नाटय़परिषदेचे पुरस्कार जाहीर

अ. भा.नाटय़ परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांना, तर आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांना

| August 6, 2013 02:35 am

अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांना, तर आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला आहे.
नाटय़परिषदेच्या वर्धापनानिमित्त गुरूवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी ५.३० वाजता चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी व प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली. लेखक प्रशांत दळवी यांना जयवंत दळवी पुरस्कार, चिन्मय मांडलेकर व सोनाली कुलकर्णी यांना अभिनयासाठीचा पुरस्कार देण्यात येणार असून अविनाश देशमुख, सुहास मुळे, इक्बाल दरबार, सुहास गवते, मैथिली पाटील, नीलम कदम, प्राजक्ता वाणी, केनन लुंकड, केदार अभ्यंकर, सागर चव्हाण यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 2:35 am

Web Title: anand bhate honoured by balgandharva award
Next Stories
1 डॉक्टरकडून मारहाणीत रखवालदाराचा मृत्यू
2 शहरात औषधांचा तुटवडा कायम – कंपन्यांकडून पुरेसा स्वस्त माल उपलब्ध नाही
3 पुणे बचाव कृती समितीतर्फे बालगंधर्व कलादालनात उद्या सात/बारा उताऱ्यांचे प्रदर्शन
Just Now!
X