News Flash

विश्व साहित्य संमेलन घरबसल्या पाहण्याची संधी

‘लाईफ पुणे’ हे संकेतस्थळ संमेलनाचे थेट प्रक्षेपण करणार आहे.

| August 20, 2015 03:05 am

अंदमान येथे होत असलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचा आनंद जगभरातील साहित्यप्रेमींना घरबसल्या पाहता येणार आहे. ‘लाईफ पुणे’ हे संकेतस्थळ संमेलनाचे थेट प्रक्षेपण करणार आहे. या संकेतस्थळाने यापूर्वी घुमान येथील ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही थेट प्रक्षेपण केले होते.
ऑफबीट डेस्टिनेशन आणि पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ आणि ६ सप्टेंबरला विश्व साहित्य संमेलन होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून होत असलेले हे संमेलन सावकरांना समर्पित करण्यात आले आहे. या संमेलनाला जगभर पोहोचविण्यासाठी ‘लाईफ पुणे’ या संकेतस्थळाचे समीर देसाई, हेमंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. संमेलनाचे थेट प्रक्षेपण करताना पूर्वतयारीसह प्रत्यक्ष संमेलनातील उद्घाटन, समारोप, चर्चासत्र, परिसंवाद आणि व्याख्याने हे कार्यक्रम दाखविले जाणार आहेत. या संमेलनाच्यानिमित्ताने साहित्यिकांच्या विशेष मुलाखतीही घेण्यात येणार आहेत. अंदमानची लोककला आणि पर्यटनस्थळांचेही चित्रीकरण घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती ऑफबीट डेस्टिनेशनचे नितीन शास्त्री यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 3:05 am

Web Title: andaman vishwa sahitya sammelan life pune
Next Stories
1 दाभोलकरांचे काय झाले?
2 विद्यार्थ्यांनी मला डांबून ठेवले आणि शिवीगाळ केला, एफटीआयआयच्या संचालकांचा आरोप
3 पंधरा महिन्यांचे पाणीनियोजन यंदाही कागदावरच
Just Now!
X