मुलांकडे अँड्रॉईड फोन असेल, तर आता एका एसएमएसच्या माध्यमातून मुलांवर लक्ष ठेवता येणार आहे. चोरीला गेलेला फोन शोधण्यासाठी, हजर नसतानाही एखाद्या बैठकीचा तपशील मिळवण्यासाठी, हरवलेल्या फोनमधील मजकूर एका एसएमएसच्या माध्यमातून डिलीट करण्यासाठी ही प्रणाली वापरता येणार आहे.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या हडपसर येथील जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांनी ही प्रणाली तयार केली

‘इन्फर्मेशन र्रिटीव्हल ऑफ रिमोट अँड्रॉईड मोबाईल व्हाया एसएमएस’ ही प्रणाली तयार करणाऱ्या जेएसपीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नुकतेच एमआयटीने आयोजित केलेल्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक वीणा पवार, सुनीता फडकुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. जाधव, प्रणाली विकसित करणारे शिवम खंडेलवाल, विशाल जगदाळे, अनिकेत धालवलकर, आणि प्राध्यापिका पूनम लंभाते आदी उपस्थित होते.

आहे. शिवम खंडेलवाल, अनिकेत धालवलकर, विशाल जगदाळे, मयूरेश राणे या विद्यार्थ्यांनी या प्रणालीची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाला ‘एक्स्टेंशिया इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ या कंपनीने प्रायोजकत्व दिले असून या प्रणालीचे पेटंट घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
हे अँड्रॉईड अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केलेला फोन नेमका कोणत्या ठिकाणी आहे, त्याचे ठिकाण एसएमएसच्या माध्यमातून कळू शकते. फोनवरील शेवटचे पाच कॉल्स, एसएमएस यांचीही माहिती या प्रणालीद्वारे मिळू शकते. त्यामुळे आपला मुलगा कुठे आहे, काय करत आहे याकडे लक्ष ठेवणे पालकांना शक्य होणार आहे. हरवलेल्या फोनमधील माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन एसएमएसच्या माध्यमातून फोनमधील माहिती डिलिट करता येते किंवा दुसऱ्या फोनवर मिळवता येऊ शकते. यासाठी ज्या फोनवरून एसएमएस करायचा आहे, तो अँड्रॉईड असण्याचीही आवश्यकता नाही. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहू शकत नसताना किंवा एखाद्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहू शकत नसताना त्या ठिकाणी नेमके काय घडते आहे, त्याची माहितीही या प्रणालीच्या माध्यमातून घेता येणार आहे. बैठकीच्या ठिकाणी ही प्रणाली असलेला अँड्रॉईड फोन असेल, तर एका एसएमएसच्या माध्यमातून त्या फोनमधील रेकॉर्डिगची सुविधा सुरू करता येऊ शकते आणि दुसऱ्या फोनवर त्याचे तपशील मिळू शकतील.
प्रत्येक वापरकर्त्यांला विशिष्ट कोड देऊन त्या माध्यमातूनही वापरता येणार आहे. या प्रणालीच्या सर्व चाचण्या सध्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यानंतर व्यावसायिक वापराच्यादृष्टीने या प्रणालीचा विचार केला जाऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने आणि गैरवापर टाळण्याच्या दृष्टीने या प्रणालीमध्ये सध्या काही सुधारणा करण्यात येत आहेत, अशी माहिती सहायक प्राध्यापक उल्हास माळवदे यांनी दिली.
हे अॅप कशाकशासाठी वापरता येऊ शकते?
– एखादा फोन कोणत्या ठिकाणी आहे, त्यावरील एसएमएस व फोन कॉल्स कोणते हे समजू शकेल.
– हरवलेल्या फोनमधील महत्त्वाचा तपशील एसएमएसच्या माध्यमातून डिलिट करणे शक्य.
– हरवलेल्या फोनमधील शेवटचे पाच एसएमएस व शेवटचे पाच फोन कॉल्स दुसरा फोन वापरून मिळवणे शक्य.
– एक अॅन्ड्रॉईड फोन आणि दुसरा सामान्य फोन असेल तरी हे अॅप वापरणे शक्य.