महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेतर्फे दिला जाणारा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व लातूरचे ग्रामीण क्षेत्रातील डॉ. अशोक कुकडे यांना दिला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी अण्णा भाऊंच्या जयंतीच्या ऑगस्ट महिन्यात हा पुरस्कार दिला जातो. या वर्षीचे इतर पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील डॉ. पी.ए. इनामदार, ज्येष्ठ साहित्यिक निलीमा गुंडी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे, राधेश्याम पुरोहित, राजकीय कार्यकर्ते कृष्णकांत कुदळे यांना दिला जाणार आहे. पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व रामदास आठवले यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.

Ashok Chavan, Voters called
अशोक चव्हाणांच्या मंत्रिपदासाठी मतदारांना भावनिक साद!
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान