कलेचे वरदान लाभलेल्या हातातील मातीच्या गोळ्यांना मिळालेला आकार.. मातीला आकार देताना सुबकपणाची आलेली प्रचिती.. हुबेहूब चेहरा, कान, नाक, डोळे आणि केशरचना अशा गोष्टी साकारत असताना त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचे लाभलेले भाग्य.. तब्बल १०५ मिनिटांच्या मेहनतीनंतर हुबेहूब साकारलेले अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प.. जणू प्रत्यक्ष अण्णाभाऊ आपल्यासमोर असावेत याची अनुभूती घेत रसिकांनी प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कलेला गुरुवारी कुर्निसात केला.

लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षांरंभानिमित्त संवाद पुणे आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित महोत्सवात प्रमोद कांबळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे यांचे सुंदर शिल्प साकारले. या निमित्ताने त्यांनी अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह रसिकांशी संवाद साधला. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, महोत्सवाचे निमंत्रक राजेश पांडे, अण्णाभाऊ  साठे अध्यासनाचे प्रमुख सुनील भंडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे या वेळी उपस्थित होत्या.

drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

कांबळे म्हणाले, शिल्प साकारण्यासाठी केवळ मातीचा उपयोग होत नाही. ज्या व्यक्तिमत्त्वाचे शिल्प साकारायचे त्यांच्या साहित्याचे वाचन करून त्यांचे विचार आत्मसात करायला हवेत.

हे शिल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अण्णाभाऊ  साठे अध्यासनात स्थापन करण्याचा प्रयत्न करू, असे महोत्सवाचे निमंत्रक राजेश पांडे यांनी या वेळी सांगितले. फुटाणे म्हणाले, स्टुडिओ आगीत खाक झाल्यानंतर प्रमोद कांबळे नव्या धडाडीने उभे राहिले आहेत. ही त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे. पुतळे उभारण्याची आपल्याला सवय लागली आहे, पण ज्यांचे पुतळे उभारतो त्यांचे विचार मात्र आपण घेत नाही.