06 March 2021

News Flash

गुंड गजा मारणेची समाजमाध्यमावर दहशत

शहरात झालेल्या दोन खुनांच्या गुन्ह्यातून मारणे आणि साथीदारांची मुक्तता झाली.

संग्रहीत

पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आणखी एक गुन्हा

पुणे : तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर मोटारीच्या ताफ्यातून कोथरूडपर्यंत मिरवणूक काढणाऱ्या गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि साथीदारांनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मारणे टोळीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

शहरात झालेल्या दोन खुनांच्या गुन्ह्यातून मारणे आणि साथीदारांची मुक्तता झाली. त्यानंतर तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या मारणे आणि साथीदार दोनशे मोटारींच्या ताफ्यातून कोथरूडमध्ये आले. द्रुतगती मार्गावर मारणे टोळीतील गुंडांनी धुडगूस घातला. मोटारीतून निघालेल्या मिरवणुकीचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. या प्रक रणी मारणे आणि साथीदारांविरोधात खालापूर, शिरगाव, वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मारणेच्या साथीदारांकडून महागड्या मोटारी आणि ड्रोन कॅमेरा जप्त करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मारणे आणि साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मारणे टोळीवर केलेल्या कारवाईचा अहवाल पाठविण्याची सूचना पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.

मारणे आणि त्याच्या साथीदारांनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड तपास करत आहेत.

मारणे आणि साथीदारांविरोधात आणखी सात गुन्हे दाखल असून ते न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्यातील साक्षीदार आणि तक्रारदारांवर दबाब निर्माण केल्याने त्याच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्यात दोषमुक्त झाला. उच्च न्यायालयाने साक्षीदारांवर दबाब आणता येणार नाही, असे निवाडे दिले आहेत. मारणे याचे दहशत निर्माण करण्याचे कृत्य न्यायनिवाडे आणि मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे.

गुंडाला ‘लाइक’ करणे देखील गुन्हा

एखाद्या गुंडाने समाजात दहशत निर्माण करण्यासाठी ध्वनिचित्रफीत प्रसारित केली असेल किंवा त्याने प्रसारित केलेल्या ध्वनिचित्रफितीला ‘लाइक ’ करणे तसेच त्यावर भाष्य करणे हा देखील गुन्हा ठरणार आहे. अशा कृतीमुळे गुंडांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे गुंडाच्या पाठराख्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:02 am

Web Title: another offense by order of the commissioner of police akp 94
Next Stories
1 शनिवारवाड्याला पर्यटकांची पसंती
2 स्मार्ट विकासाच्या कोंडीतील प्रभाग
3 पुणे शहरात दिवसभरात ६६१ नवे करोनाबाधित, चार रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X