अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर राजकारण चांगलंच पेटलं असून आज एनसीबी ने रियाला ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आली. एकीकडे मुंबईमध्ये ही घडामोड घडत असताना लोणावळा परिसरातील पवना डॅम येथील सुशांतसिंहच्या हँग आऊट फार्म हाऊसवर अंमली पदार्थ विरोधी पथक दुपारी पोहचले आहे. फार्म हाऊसवर तपासणी सुरू आहे. दरम्यान, येथे मीडियाला मज्जाव करण्यात आला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा आराम करण्यासाठी लोणावळा परिसरतील पवना डॅम येथे असलेल्या हँग आऊट फार्म हाऊसवर येत असे. इथे अनेकदा रिया देखील आल्याचं सांगण्यात येत आहे. हे फार्म हाऊस हे भाडेतत्वावर घेतले होते अशी ही माहिती आहे. सुशांतच्या आत्महत्यानंतर येथील फार्म हाऊसवरील एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यात सुशांत हा या ठिकाणी आला असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, एनसीबी ने रियाला अटक केल्यानंतर आज दुपारी मुंबई येथील अंमली पदार्थ पथक हे सुशांतच्या हँग आऊट फार्म हाऊसवर पोहचले असून तिथे काही धागेदोरे हाती लागतात का ते पथकातील अधिकारी पाहात आहेत. मीडियाला मज्जाव करण्यात आला होता. दुपार पासून अद्याप ही त्यांची तपासणी सुरू असून त्यांच्या हाती काय लागत हे पाहावे लागेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 8:26 pm