News Flash

अप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दी समितीतर्फे शनिवारी परिसंवाद

जन्मशताब्दी समितीतर्फे रविवारी (२० डिसेंबर) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत डॉ. अप्पा पेंडसे अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे

| December 16, 2015 03:05 am

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि. वि. (अप्पासाहेब) पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षांमधील कार्यक्रमांना सुरुवात होत असून अप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दी समितीतर्फे शनिवारी (१९ डिसेंबर) ‘भारत-२०५०, विश्वसत्ता’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
शिवदर्शन चौक, पर्वती येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनचे संचालक डॉ. विवेक सावंत, गोखले इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. राजस परचुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण अभ्यास विभागाचे डॉ. श्रीकांत परांजपे हे सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट परिसंवादाचा समारोप करणार आहेत. परिसंवादाचा प्रारंभ शनिवारी सायंकाळी सहा वाजता होईल.
जन्मशताब्दी समितीतर्फे रविवारी (२० डिसेंबर) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत डॉ. अप्पा पेंडसे अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती पुणे आणि ज्ञान प्रबोधिनी परिसराभोवतीची एक प्रतीकात्मक फेरी असे या पदयात्रेचे स्वरूप असेल. प्रबोधिनीचे आजी-माजी विद्यार्थी, कार्यकर्ते, हितचिंतक, अप्पांचे इतर परिचित या फेरीत सहभागी होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 3:05 am

Web Title: appasaheb pendse birth centenary committee seminar
Next Stories
1 पानसरे हत्याप्रकरण: ‘त्या’ लहान मुलाने समीर गायकवाडला घटनास्थळी पाहिले होते
2 शरद जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
3 अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई
Just Now!
X