25 February 2021

News Flash

स्थायी समितीवर आठ नगरसेवकांची नियुक्ती

विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना पुन्हा संधी

(संग्रहित छायाचित्र)

विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना पुन्हा संधी

पुणे : महापालिके च्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी मंगळवारी मुख्य सभेत नव्या आठ नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली. राजकीय समीकरणे जुळवित या वेळी उपनगरामधील नगरसेवकांना स्थायी समितीमध्ये संधी देण्यात आली आहे. स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनाही पक्षाने पुन्हा संधी दिली असून त्यांच्याकडे पुढील वर्षभरासाठी अध्यक्षपद राहण्याची के वळ औपचारिकता बाकी आहे.

महापालिके च्या आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या २८ फे ब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी नव्या आठ नगरसेवकांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मंगळवारी दूरचित्र संवाद माध्यमातून झालेल्या मुख्य सभेत नव्या नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह राहुल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, महेश बावळे, मनीषा कदम आणि अर्चना पाटील यांची नियुक्ती के ली. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमहापौर सुनील ऊर्फ बंडू गायकवाड आणि प्रदीप गायकवाड यांना संधी दिली.

शहराची तिजोरी अशी ओळख असलेल्या स्थायी समिती अन्य समित्यांमध्ये महत्त्वाची आहे. या समितीमध्ये सोळा नगरसेवक असून त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि काँग्रेस तसेच शिवसेनेचा प्रत्येकी एक-एक नगरसेवक आहेत. यातील भारतीय जनता पक्षाच्या सहा नगरसेवकांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा नगरसेवकांची मुदत संपणार आहे. पालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:32 am

Web Title: appointment of eight corporators on the standing committee zws 70
Next Stories
1 तांदूळ निर्यातीत भारत पहिला
2 आरोग्य, शारीरिक शिक्षण परीक्षेबाबत संभ्रम
3 सी-डॅकच्या पुनर्परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
Just Now!
X