मालमत्तांचे वाद सोडवण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे : केंद्राच्या महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील हवेली, पुरंदर आणि दौंड तालुक्यांमधील १०८ गावांतील ग्रामस्थांना येत्या दोन वर्षांत स्वतंत्र मिळकतपत्रिका मिळणार आहेत. या गावांमधील गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करून या मिळकतपत्रिका देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी संबंधित गावांमधील मालमत्तांविषयीचे वाद सोडवण्यासाठी २१ चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच के ली आहे.

राज्यातील गावठाण मोजणी न झालेल्या सर्व गावांचे गावठाणातील मिळकतींची मोजणी करून मिळकतधारकांना मिळकतपत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख उपलब्ध करून देण्यासाठी के ंद्र सरकारने स्वामित्व योजना सुरू के ली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८९० गावांपैकी ११८४ गावांची ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींची मोजणी करून नगर भूमापन करण्यात येणार आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याने दररोज दोन गावांमधील मिळकतींचे वाद सोडवून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

त्यानुसार सध्या हवेली तालुक्यातील ३२, पुरंदरमधील ४७ आणि दौंडमधील २९ अशा एकू ण १०८ गावांमधील गावठाणांच्या मिळकतीचे वाद सोडवून अभिलेख निश्चित करण्यासाठी २१ अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी के ली आहे. त्यानंतर या गावांमधील गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांकडून संबंधित गावांमधील जमिनींचे वाद सोडवून अभिलेख निश्चित करणार आहेत. त्यानुसार या गावांमधील मिळकतधारकांना स्वतंत्र मिळकतपत्रिका देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ११८४ गावांची निवड

महसूल, भूमिअभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे जिल्ह्यातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुरंदर, हवेली आणि दौंड तालुक्यातील ११८४ गावांची निवड करण्यात आली आहे. ड्रोनद्वारे होणाऱ्या या मोजणीमुळे ग्रामपंचायतींच्या हद्दींचे नकाशे उपलब्ध होणार आहेत. मिळकतींचे सर्वेक्षण करून डिजिटाइज नकाशे तयार के ले जाणार आहेत. या गावांतील ग्रामपंचायतींचे नकाशे, सरकारी जमिनी आणि सरकारी जमिनींवर झालेली अतिक्रमणे याबाबतची माहितीही उपलब्ध होणार आहे.

अशी होईल मोजणी

  •  गावठाण मोजणीसाठी जिल्हानिहाय प्रत्येकी एका ड्रोनची व्यवस्था
  • सर्वेक्षण क्रमांकाच्या अभिलेखांद्वारे गावठाणांच्या सीमा निश्चित करून खांब लावण्याची प्रक्रिया
  • ड्रोनद्वारे मोजणी करण्यापूर्वी गावठाणांचे ड्रोन छायाचित्र
  • ड्रोन छायाचित्रांबरोबर डिजिटल नकाशा तयार करण्याची प्रक्रिया
  •  नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्यानंतर गावठाणांच्या नकाशांची निश्चिती