विविध रंगातील, वेगवेगळ्या आकारातील आणि प्रजातींचे मासे पाहण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या संभाजी उद्यानातील मत्स्यालयाचे विस्तारीकरण होणार आहे. सध्या एक हजार चौरस फूट जागेत असलेले मत्स्यालय लवकरच दुप्पट जागेत म्हणजेच दोन हजार चौरस फूट जागेमध्ये जाणार आहे. मत्स्यालयाच्या नूतनीकरणानंतर गोडय़ा पाण्यातील मासे पाहणाऱ्या पुणेकरांना खाऱ्या पाण्यातील दुर्मीळ प्रजातींचे मासे पाहावयास मिळणार आहेत.
देशातील काही शहरांमध्ये खासगी स्वरूपात चालविली जाणारी मत्स्यालये (अॅक्वेरियम) आहेत. मात्र, महापालिकेतर्फे चालविले जाणारे हे एकमेव मत्स्यालय आहे. संभाजी उद्यानामध्ये १ ऑगस्ट १९५३ रोजी सुरू झालेल्या मत्स्यालयाचा सहा दशकांनी कायापालट होणार आहे. त्यामुळे नव्या स्वरूपात साकारण्यात येणाऱ्या मत्स्यालयासाठी १ ऑगस्ट हाच उद्घाटनाचा मुहूर्त असावा हा प्रयत्न राहणार आहे. महापालिका उद्यान विभागाच्या इमारतीतील तळमजल्यावर हे मत्स्यालय आहे. या मत्स्यालयाच्या मागील बाजूस असलेला अभियांत्रिकी विभाग उद्यानामध्येच अन्य ठिकाणी स्थलांतरित होत असल्याने सुमारे एक हजार चौरस फूट जागा मत्स्यालयासाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्य उद्यान अधीक्षक तुकाराम जगताप यांनी दिली.
सध्याच्या मत्स्यालयामध्ये ६ फूट लांब, प्रत्येकी २ फूट रुंद आणि उंची असलेले १४ फिश टँक आहेत. या टँकच्या माध्यमातून विविध २५ प्रजातींचे अडीचशेहून अधिक मासे पाहता येतात. या विस्तारीकरणानंतर मत्स्यालयातील फिश टँकची संख्याही वाढणार आहे. ३० फिश टँकद्वारे माशांच्या आणखी प्रजाती पाहण्याची संधी नागरिकांना मिळू शकते. बालकांसाठी एक रुपया आणि प्रौढांसाठी दोन रुपये अशा नाममात्र शुल्कामध्ये विविध प्रकारचे मासे पाहता येत असल्यामुळे उद्यानामध्ये येणारे नागरिक आणि पर्यटक मत्स्यालयाला आवर्जून भेट देतात. वर्षभरामध्ये किमान पाच लाख नागरिक मत्स्यालयाला भेट देतात. शहरातील या एकमेव मत्स्यालयामध्ये आतापर्यंत केवळ गोडय़ा पाण्यातील मासे होते. मात्र, नूतनीकरणानंतर पर्यटकांना खाऱ्या पाण्यातील मासे पाहता येतील. फिश टँकची रचना ही अधिक आकर्षक करण्याचे नियोजन असून त्यामध्ये टँकच्या लांबीएवढय़ाच फुटाची उंची असेल, अशी माहिती मत्स्य पर्यवेक्षक अभय कौलगुड यांनी दिली.
खाऱ्या पाण्यातील माशांसाठी
मत्स्यालयामध्ये सध्या असलेल्या गोडय़ा पाण्यातील माशांबरोबर खाऱ्या पाण्यातील दुर्मीळ प्रजातींचे मासे पाहता येणार आहेत. या माशांसाठी मीठ टाकून पाणी खारट करण्यात येणार आहे. माशांसाठी फिल्टर, हिटर, प्रोटिन स्किमर, नायट्रेट तपासण्यासाठी टेस्ट किट अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मरिन फिश कायद्यानुसार परवानगी असलेले आणि पुण्याच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकणारे मासे येथील फिश टँकमध्ये ठेवण्यात येणार आहेत. खाऱ्या पाण्यातील माशांचे संगोपन खर्चिक असल्याने एकच फिश टँक असेल, असेही अभय कौलगुड यांनी सांगितले.

mumbai businessman cheated for rupees 22 lakhs, lure of secret gold
गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार