करोनाच्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (एमडी, एमएस) अभ्यासक्रमांच्या परीक्षा लांबणीवर गेल्याने निवासी डॉक्टर रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यामुळे शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी वाढीव कालावधीसाठी निवासी डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करण्यासह पूर्ण विद्यावेतन देण्याच्या सूचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने  के ल्या आहेत.

करोना बाधितांवर उपचारांसाठी डॉक्टरांची कमतरता पडू नये यासाठी अंतिम वर्षाच्या निवासी डॉक्टरांना सेवेत कायम ठेवले जाणार आहे.  पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया होऊन नवीन निवासी डॉक्टर येईपर्यंत अंतिम वर्षातील निवासी डॉक्टरांना राहण्याची सुविधा आणि विद्यावेतन देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.