पिंपरी-चिंचवड शहरातून अवघ्या दहा मिनिटात फॉर्च्युनर, इनोव्हा आणि स्कार्पिओ सारख्या महागड्या गाड्या चोरणाऱ्या अज्ञात सराइत चोरट्यास राजस्थान येथून गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. त्याच्याकडून १ कोटी १३ लाखांची सहा वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत. ओमप्रकाश लादुराम बिस्नोई (वय-२८) यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या अटकेनंतर शहरात त्याने केलेले १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून पळवलेल्या महागड्या गाड्या राजस्थानला नेवून अंमली पदार्थ आणि मद्य तस्करी करणाऱ्यांना तो विकत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातून फॉर्च्युनर, इनोव्हा आणि स्कार्पिओ या महागड्या गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. शहरातून एकुण ११ तर पुण्यातून एक गाडी चोरीला गेली होती. यामध्ये तीन फॉर्च्युनर गाड्यांचा समावेश होता. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलेली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातील सीसीटीव्हीची पोलिसांनी बारकाईने पाहणी केली. याद्वारे त्यांना यातील एक गाडी राजस्थानच्या दिशेने गेली असल्याचा निदर्शनास आले. त्याच दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या पथकातील एकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहरात चोरी होणाऱ्या गाड्या राजस्थान येथे विकल्या जात आहेत.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

यानंतर गुन्हे शाखा युनिट  एकने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्यासह सात जणांचे पथक राजस्थान येथे आरोपी ओमप्रकाशचा शोध घेण्यास रवाना केले. राज्यात विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यात आला, आठ दिवसानंतर आरोपी अजमेर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर पोलिसांनी त्याचा माग काढत व पाठलाग करून त्याला शिताफीने अटक केली. आरोपीला पिंपरी-चिंचवड शहरात आणून अधिक चौकशी केली असता रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्या चोरणे अगदीच सोपे असल्याचे सांगत त्याने चोरीची कबुली दिली. तो अवघ्या दहा मिनिटांतच गाडीचे लॉक तोडून गाडीसह फरार व्हायचा. यानंतर पुण्याच्या बाहेर जाताच नंबर प्लेट बदल्या जात, चेसी नंबर आणि इंजिन नंबर ग्रँडरच्या सहाय्याने खोडून काढत आणि धुळे मार्गे तो गुजरातमध्ये प्रवेश करत असे व तेथून राजस्थानला जात असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे.

परी-चिंचवड, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे तसेच गुजरात या राज्यातून आरोपी महागड्या गाड्यांची चोरी करत होता. याशिवाय आरोपी ओमप्रकाशवर पंजाब, राजस्थान, गुजरात येथे गुन्हे दाखल आहेत. त्याला दहा वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. यातील सात वर्षे त्याने शिक्षा भोगलेली आहे. त्यानंतर तो कारागृहातून सुटला होता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यानी केली.