News Flash

राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण : मुख्य आरोपी राकेश मौर्या याला अटक!

कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपी राकेश मौर्या याला अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आलं आहे.

कलादिग्दर्शक राजेश सापते यांनी वाकड परिसरातील फ्लॅटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.

कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी पुण्याच्या वाकड परिसरातील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी राकेश मौर्या याला आज वाकड पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरच्या पिंपरी परिसरातील एका हॉटेलमध्ये आरोपी राकेश मौर्या आला असता त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी आत्तापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राकेश मोर्या हा संबंधित हॉटेलमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासंदर्भात वकिलाशी बोलणी करण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पावलं उचलत त्याला अटक केली आहे.

नेमकं झालं काय?

राजेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. तसेच, एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला होता. यामध्ये त्यांनी आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावं घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच आरोपींनी राजेश साप्ते यांना जीव मारण्याची धमकी देखील दिली होती. लेबरला कामावर येऊ देणार नाही, व्यावसायिक नुकसान करू अशी धमकी दिल्याची तक्रार राजेश साप्ते यांच्या पत्नी सोनाली साप्ते यांनी फिर्यादीत केली होती. राजेश साप्ते यांच्याकडे दहा लाख रुपये एकरकमी आणि प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक लाख रुपये मागणी करण्यात आली होती. तसेच, अडीच लाख रुपये देण्यास भाग पाडण्यात आल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

चित्रसृष्टीला गुंडगिरीचा विळखा…

राजेश साप्ते यांनी आत्महत्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये राकेश मौर्या त्रास देत असल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने नरेश विश्वकर्मा मिस्त्री, गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्या, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशा लोकांवर गुन्हा दाखल केला. त्याशिवाय साक्षीदारांच्या जबाबानंतर दीपक खरात नावाच्या अजून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दीपक खरात राकेश मौर्या आणि गंगेश श्रीवास्तव यांच्यासाठी वसुली करत होता. राजेश साप्ते यांना देखील दीपक खरात याने धमकावल्याची माहिती साक्षीदारांच्या जबाबातून समोर आलं आहे.

“राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्येचा मार्गावर असताना ठाकरे सरकार …”; भाजपाची जोरदार टीका!

आत्महत्येपूर्वी राजेश साप्ते काय म्हणाले होते?

“नमस्कार,….मी राजेश मारुती साप्ते! मी आर्ट डायरेक्टर आहे. मी कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही. मी, पूर्ण विचारांती हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मोरया लेबर युनियन हे खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलं आहे. माझी कुठलीही कंप्लेन्ट तिकडे नाही. राकेश मोरया युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दामहून फोन करून त्यांच्याकडून वदवून घेत आहेत की, राजू सापते यांनी एक का देड दिया नहीं… हे कालही मी क्लिअर केलं आहे. नरेश मिस्त्री नावाच्या व्यक्तीने पण फोन करून विचारलं असता त्यांनी ही सांगितलं की माझं पेमेंट पूर्ण आहे. नरेश मिस्त्री यांनी सांगितलं की आजपर्यंत दादांनी कुठलंही पेमेंट अर्धवट केलेलं नाही. तरीही राकेश मोरया हे मला खूप सतावत आहेत. ते माझं कोणतंही काम चालू करू देत नाहीत. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. ज्याचं मला, इमिजेट काम सुरू करायच आहे. त्यातला एक प्रोजेक्ट काल मला झीचा सोडून द्यावा लागला. कारण मला ते कामच करू देत नाहीत. दशमी क्रियेशनचं काम चालु असताना ते त्यांनी थांबवलं आहे. या गोष्टींचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा….धन्यवाद!.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 7:49 pm

Web Title: art director rajesh sapte suicide case main accuse rakesh maurya arrested by pune police pmw 88
टॅग : Crime News
Next Stories
1 “आपली सूत्रं येरवडा जेलमधून हालतात”, म्हणणाऱ्या यम भाईला पुणे पोलिसांचा हिसका; हात जोडून मागितली माफी
2 सूर्यामधून तोफगोळासदृश उत्सर्जनाचा पल्सारच्या साहाय्याने उलगडा
3 करोनाच्या दोन लशींची मिश्र मात्रा घेणे जोखमीचे
Just Now!
X