‘इंडियन एक्सप्रेस’चे छायाचित्रकार अरूल होरायझन यांच्या छायाचित्राला ‘ सर्कस फेडरेशन ‘ या संस्थेच्या मुखपत्रात स्थान मिळाले आहे. संस्थेतर्फे ‘सर्कस’ या विषयावर छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत होरायझन यांनी  कोल्हापूरमध्ये काढलेल्या छायाचित्राची निवड करण्यात आली आहे.
२०१२ मध्ये कोल्हापूरमधील एका अनाथालयाच्या मुलांसाठी ‘रँबो सर्कस’मध्ये काम करणाऱ्या विदूषकांच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हे छायाचित्र काढण्यात आले आहे. सर्कसमधील क्षणचित्रे टिपणे हा अरूल यांचा छंद आहे. यापूर्वी २०१० मध्ये आरूल यांनी टिपलेले रँबो सर्कसच्याच विदूषकांचे आणखी एका छायाचित्र स्पर्धेत अव्वल ठरले होते.
‘सर्कस फेडरेशन’ ही संस्था जागतिक स्तरावर ‘सर्कस’ या कलेचे जतन व संवर्धन करण्याचे काम करते. संस्थेचे मुखपत्र  http://www.circusfederation.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.