News Flash

कबीर कला मंचच्या अटकेतील सदस्यांसोबत अरुण भेलके याचे फोटो एटीएसला मिळाले

कबीर कला मंचच्या अटक केलेल्या काही सदस्यांसोबत पुण्यात पकडलेला नक्षलवादी अरुण भेलकेचे फोटो दहशतवाद विरोधी पथकाला सापडले आहेत. त्या दोघांकडे पंधराजणांचे मोबाईल क्रमांक मिळाले असून

| September 6, 2014 02:15 am

कबीर कला मंचच्या अटक केलेल्या काही सदस्यांसोबत पुण्यात पकडलेला नक्षलवादी अरुण भेलकेचे फोटो दहशतवाद विरोधी पथकाला सापडले आहेत. त्या दोघांकडे पंधराजणांचे मोबाईल क्रमांक मिळाले असून त्यांचा भेलकेशी काय संबध आहे याची एटीएसकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, भेलके याने कबीर कला मंचच्या अटक झालेल्या काही सदस्यांना जंगल भागात नेऊन परत शहरी भागात सोडण्याचे काम केल्याची माहिती एकेकाळचा भेलकेचा सहकारी आणि नक्षलवादी चळवळीतून समर्पण  केलेल्या व्यक्तीने पोलिसांना जबाबात दिली आहे.
पुण्यात सक्रिय असलेला भेलके व त्याची पत्नी कांचन ननावरे हिला पुणे एटीएसच्या पथकाने अटक केली होती. त्या दोघांना ९ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कोठडीत एटीएसने त्यांच्याकडे कसून तपास केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. कान्हे फाटा येथील एका खोलीतून एटीएसने एक लॅपटॉप आणि सीडी जप्त केली आहे. त्यामधून नक्षलवादी चळवळीबाबतची माहिती मिळाली आहे. भेलकेसोबत देशभक्त युवा मंचच्या माध्यमातून काम केलेल्या नक्षलवाद्याने समर्पण केले आहे. त्याने चंद्रपूर पोलिसांना दिलेल्या जबाबत भेलके आणि कबीर कलामंचच्या संबंधाची माहिती दिली आहे.
समर्पण केलेल्या नक्षलवादीने दिलेल्या जबाबानुसार, तो मूळचा यवतमाळचा असून नागपूर येथे आयटीआयचे प्रशिक्षण घेत असताना भेलके सोबत त्याचा संबंध आला. त्यानंतर त्याने नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेच्या सांगण्यावरून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अटक आरोपी अनुराधा सोनुलेसोबत विवाह झाला. त्यावेळी त्याच्याकडे पुण्यातील खडकी येथील दारूगोळा फॅक्टरी येथून नगरला जाणाऱ्या ट्रकचा सव्र्हे करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. २०१२ मध्ये एटीएसने अंजोला सोनटक्केसह कबीर कला मंचच्या सदस्यांना अटक केली. त्यामुळे अरुण भेलके याने कबीर कला मंचचे सदस्य सचिन माळी, शीतळ साठे, गोरखे यांना अटक होण्याच्या भीतीने २०१२ मध्ये जंगलात आणून सोडले. त्यानंतर जुलै २०१२ मध्ये भेलके त्यांना पुन्हा चळवळीत काम करण्यासाठी पुणे आणि मुंबई परिसरात घेऊन गेला. तेव्हापासून भेलके पुण्याच्या शहरी भागात नक्षलवादी चळवलीचे काम करीत आहे.
याबाबत पुणे एटीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, भेलकेकडे चौकशी केल्यानंतर एक लॅपटॉप आणि सीडी मिळाली आहे. त्याबरोबरच पुण्यातील ठिकाणांना सांकेतिक नावे वापरत होते त्याची माहिती मिळाली आहे. या दोघांकडे पंधराजणांचे मोबाईल क्रमांक मिळाले असून त्यांचा यांच्याशी काय संबंध आहे, याबाबत चौकशी केली जाणार आहे.  
पुणे गोल्डन कॉरीडॉर भेलकेकडे जबाबदारी
पुणे एटीएसनेच २०११ मध्ये पुणे गोल्डन कॉरीडॉरची प्रमुख नक्षलवादी अंजोला सोनटक्के हिला अटक केली होती. त्यानंतर या गोल्डन कॉरीडॉरची जबाबदारी भेलके व त्याच्या पत्नीवर देण्यात आली होती. या भागात तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे ओढण्याचे काम पुणे परिसरात राहून करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:15 am

Web Title: arun bhelkes photo with kabir kala manch member
टॅग : Ats,Member,Photo
Next Stories
1 प्रश्न महिला स्वच्छतागृहांचा
2 पुण्यामध्ये आज १५ ठिकाणी रक्तदान शिबिर
3 पोळ यांच्यावर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका
Just Now!
X