News Flash

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दय़ावर ओवेसी यांची पुण्यात बुधवारी सभा

अ‍ॅक्शन कमिटी महाराष्ट्र व मुलनिवासी मुस्लिम मंचच्या वतीने येत्या ४ फेब्रुवारीला पुण्यातील गोळीबार मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन केले आहे. ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल

| February 1, 2015 02:48 am

अ‍ॅक्शन कमिटी महाराष्ट्र व मुलनिवासी मुस्लिम मंचच्या वतीने येत्या ४ फेब्रुवारीला पुण्यातील गोळीबार मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन केले आहे. ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) चे खासदार असुदुद्दीन ओवेसी हे यावेळी सभा घेणार आहेत. पुण्यातील गोळीबार मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता ही परिषद होणार आहे. मुस्लिम आरक्षण विषयावर ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे. ती आम्हाला लवकरच मिळेल, असे या परिषदेच्या संयोजकांनी सांगितले.                                                                          दरम्यान, या परिषदेसंदर्भात शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी शनिवारी पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिले आहे. त्यामध्ये ‘ओवेसी यांच्या भाषणामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या तर शिवसेना सहन करणार नाही. सभा शिवसेनेच्यावतीने बंद पाडण्यात येईल. या परिस्थितीला आयोजक जबाबदार राहतील.’ असे म्हटले आहे. यावर सहपोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले की, या संदर्भात पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जाणार आहे. भाषण ध्वनिमुद्रित केले जाते. त्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटल्यास कारवाई केली जाईल. अद्यापपर्यंत परवानगीसाठी आपणाकडे अर्ज आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2015 2:48 am

Web Title: asaduddin owaisi rally in pune on muslim reservation
Next Stories
1 ‘भेटी लागी जीवा’ छायाचित्र प्रदर्शनाद्वारे दोन दिग्गजांमधील ऋणानुबंध उलगडणार
2 स्थायी समितीच्या अध्यक्षांना अंदाजपत्रकाचे सर्वाधिकार
3 हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरमध्ये पिशवीत एका व्यक्तीच्या शरीराचे अवयव आढळले
Just Now!
X