News Flash

नव्या पिढीला काँग्रेसशी पुन्हा जोडून घ्या

अशोक चव्हाण म्हणाले, देशामध्ये भाजपाने सुरू केलेले वैचारिक प्रदूषण वाढत चालले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी आयोजित करण्यात आले होते. याच कार्यक्रमात कनेक्ट काँग्रेस या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

अशोक चव्हाण यांचे आवाहन

शालेय शिक्षणातून महात्मा गांधींचे, इंदिरा गांधींचे नाव पुसणे, राजीव गांधींना बदनाम करणे असे उद्योग भाजपाने सुरू केले आहेत. ते थांबवणे गरजेचे आहे. देशाच्या विकासात भाजपाचे योगदान नाही. देशातील नव्या पिढीला महात्मा गांधींची कारकीर्द, इंदिरा गांधींचे योगदान सांगून त्यांना काँग्रेसशी पुन्हा जोडण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात कनेक्ट काँग्रेस या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. काँग्रेसचे  सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, शरद रणपिसे, आमदार अनंत गाडगीळ, रामदार फुटाणे, रमेश बागवे, दिप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, अरिवद शिंदे, आबा बागुल, कैलास कदम, सोनाली मारणे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात कनेक्ट काँग्रेसच्या फेसबुक पेजचे अनावरणही करण्यात आले.

अशोक चव्हाण म्हणाले, देशामध्ये भाजपाने सुरू केलेले वैचारिक प्रदूषण वाढत चालले आहे. प्रसार माध्यमांपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकावर दबाव आणण्याचे काम सुरू आहे. नुकतीच राज्य शासनाने ३० टक्के नोकरकपात घोषित केली आहे. आíथक नियोजन नसल्याने राज्यात पेट्रोल, डिझेल महाग झाले आहे. त्यामुळे हे डिसकनेक्ट झालेले सरकार असून कायमस्वरुपी काम करणाऱ्या काँग्रेसला जनतेशी रिकनेक्ट करण्याची वेळ आली आहे. तरच सन २०१९ मध्ये देशात आणि राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार येईल. मी लाभार्थी या जाहिरातीमधील खरे लाभार्थी हे सरकारमधीलच आहेत. खोटं बोल, रेटून बोलं ही पद्धती अवलंबिली जात आहे. त्यामुळे सेवा, कर्तव्य, त्यागासोबतच जबाबदारपणे आपण काँग्रेसला पुढे न्यायला हवे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, काँग्रेसने नेहमीच विचार, सेवा, कर्तव्य आणि त्यागाने लढा दिला आहे. त्यामुळे कनेक्ट काँग्रेससारख्या उपक्रमातून पुन्हा एकदा तरुणाईला जोडायला हवे. मोहन जोशी यांनी काँग्रेस कनेक्ट अभियानाची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 2:47 am

Web Title: ashok chavan inaugurate sacrifice week on sonia gandhi birthday
Next Stories
1 सतीश आळेकर यांना तन्वीर सन्मान
2 आयुक्त कुणाल कुमार यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार, खासदार काकडेंचा इशारा
3 चाकणमध्ये बनावट आधारकार्ड तयार करणारे रॅकेट उद्धवस्त; चौघांना अटक
Just Now!
X