News Flash

Asian Games 2018 : टोकियो ऑलिम्पीकमध्ये पदक हेच लक्ष्य – दत्तू भोकनळ

पदक विजेत्या खेळाडूंचा पुण्यात सत्कार

दत्तू भोकनळ व अन्य साथीदारांचा सत्कार करताना महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनचे पदाधिकारी

इंडोनेशियात पार पडलेल्या आशियाडी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या रोविंगपटूंनी सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. या विजयात महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळने मोलाचा वाटा उचलला. एशियाडमध्ये पदकाची कमाई केल्यानंतर भारताच्या संघाची शनिवारी सकाळी पुण्यामध्ये मिरवणूक काढण्यात आली. दत्तू भोकनळ, स्वर्ण सिंह, ओम प्रकाश, सुखमित सिंह व अन्य खेळाडूंचा जाहीर सत्कार करण्यात आला.

शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जंगली महाराज मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात रॅलीला सुरुवात झाली. मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी यावेळी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जंगली महाराज मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय, ज्ञानेश्वर पादुका चौक आणि शिवाजीनगर असा रॅलीचा मार्ग होता. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दत्तू भोकनळ सोबत सेल्फी काढण्यासाठी आणि त्याची सही घेण्यासाठी पुणेकर क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली होती.

दत्तू व अन्य सहकाऱ्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती

 

गेलं वर्षभर या स्पर्धेसाठी आपण सराव करत होतो. यंदा पहिल्यांदाच सांघिक प्रकारात उतरत असल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त सराव करावा लागत होता. वैय्यक्तिक स्पर्धेत खेळत असताना मी २० किलोमीटर पर्यंत सराव करायचो, मात्र सांघिकसाठी मी त्याच्या दुप्पट सराव कारायला लागलो. काही गुणांच्या फरकाने मला वैय्यक्तिक प्रकारात पदक मिळवता आलेलं नसलं तरीही भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून देण्यात माझा हातभार लागला याचा मला आनंद आहे. यापुढे अधिक सराव करुन २०२० टोकियो ऑलिम्पीकमध्ये पदक मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल, लोकसत्ता ऑनलाईनशी संवाद साधताना दत्तूने आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2018 8:41 am

Web Title: asian games 2018 my next target is medal in tokyo olympic says indian rover dattu bhoknal
टॅग : Asian Games 2018
Next Stories
1 विल्यम्स भगिनींच्या झुंजीत सेरेनाची बाजी
2 Asian Games 2018 : समारोप समारंभात राणी रामपाल भारताची ध्वजधारक
3 मलिंगाचे श्रीलंका संघात पुनरागमन
Just Now!
X