पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशन येथे निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीचा हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. प्रेरणा दत्तात्रय मदने असे महिलेचे नाव आहे. तर निलंबित सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांच्या त्या पत्नी आहेत. हडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने हे एका प्रकरणात निलंबित आहे. तर त्यांची पत्नी प्रेरणा यांनी पोलीस कर्मचारी राहुल वेताळ याने अतिप्रसंग केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.
त्यानुसार आम्ही राहुल वेताळ यांच्याकडे चौकशी केली असता. त्या प्रकरणी प्रेरणा मदने यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून न आल्याने राहुल वेताळ यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आज प्रेरणा मदने यांनी पोलीस स्टेशन च्या आवारात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्या परिसरात असणार्या पोलिसांना प्रेरणा मदने स्वतःला पेटवून घेत असल्याचे लक्षात घेताच हातातील माचिस ओढून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही संबधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 5:59 pm