दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण

ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं धर्तासि.. हजारो महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक सूर उमटले आणि ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने मंगळवारी वातावरण भारून गेले.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे हजारो महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने, उपक्रमाचे प्रमुख अरुण भालेराव, शुभांगी भालेराव या वेळी उपस्थित होते.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपामध्ये गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३३ वे वर्ष होते. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

परदेशी पर्यटकांची उपस्थिती

पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती जगभरात असल्याची प्रचिती मंगळवारी पहाटे आली. गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला फ्रान्स, इस्रायल, इटली, मेक्सिको, पोलंड, तुर्कस्तानसह विविध देशांतील ३० हून अधिक परदेशी पर्यटकांनी अथर्वशीर्ष पठणासाठी हजेरी लावली. गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच पाहुण्यांनी हा सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला.