मागील काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागात सुरक्षारक्षकांचे कपडे घालून एटीएम मशीनच्या बॅटरी चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली होती. या बॅटरी चोरी करणार्‍या दोघांना पुण्यातील खडक पोलिसांनी अटक केली आहे.

भगवान विश्वनाथ सदार आणि जगदीश जगदेव हिवराळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. खडक पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे उत्तम चक्रे यांनी दिलेल्या माहिती नुसार, दोन्ही आरोपीपैकी भगवान विश्वनाथ सदार हे सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. त्यामुळे त्या आरोपीला माहिती होते की, एटीएम मशीनच्या बॅटरीबद्दल माहिती होती. तसेच एटीएममधील बॅटरी कशी काढली जाते याबाबतही त्याला माहित होते. त्यातच सुरक्षारक्षकाचे काम करत असल्यामुळे कपडेही होते. तेच कपडे घालून ते एटीएम मशीनमधून बॅटरी चोरी करत होता. आजपर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर आणि अकोला येथील तब्बल १६ठिकाणावरील एटीएम मशीनच्या बॅटरी चोरील्या आहेत.

आरोपी एटीएमची बॅटरी चोरून विक्री करीत होते. आरोपींबाबत माहिती मिळताच दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपींकडून दोन लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. खडक पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.