News Flash

मध्य प्रदेशातील शस्त्रास्त्रांच्या तस्करीत पसार असलेल्या आरोपींना एटीएसने पकडले

मंगळवारी (२ ऑगस्ट) येरवडा भागात ही कारवाई करण्यात आली.

मध्य प्रदेशातील बडवानी भागात शस्त्रास्त्रांच्या तस्करीत पसार झालेल्या पुण्यातील दोघा सराइतांना राज्य दहशतवादविरोधी (एटीएस)पथकाने पकडले. मंगळवारी (२ ऑगस्ट) येरवडा भागात ही कारवाई करण्यात आली.

रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय २९, रा. दारुवाला पूल, सोमवार पेठ) आणि अखिल ऊर्फ  ब्रिटिश अनिल पालांडे (वय २१, रा.माणिक कॉलनी, लोहगाव रस्ता, धानोरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. मध्य प्रदेशातील बडवानी भागात शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याप्रकरणी तेथील पोलिसांनी पुण्यातील सराईत सुमित मिलिंद चव्हाण याला पाठलाग करून पकडले होते. त्याच्याकडून देशी बनावटीची आठ पिस्तुले जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी मध्य प्रदेशातील वरला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सुमितच्या सोबत असणारे साथीदार रोहन चव्हाण व अखिल पालांडे तेथून पसार झाले होते. तेथील पोलिसांनी व्हॉट्स अ‍ॅपवरून ही माहिती पुण्यात दिली होती. त्या अनुषंगाने एटीएसच्या पुणे विभागाचे पथक आरोपींचा माग काढत होते.

आरोपी रोहन व अखिल मंगळवारी सकाळी येरवडा भागातील सादलबाबा दग्र्याजवळ येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सुनील पवार यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघांना पकडण्यात आले. एटीएसचे पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेंद्र काळडोके, सुनील पवार, योगेश कुंभार, मोहन डोंगरे, प्रशांत धुमाळ यांनी ही कारवाई केली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 4:13 am

Web Title: ats caught accused arms smuggling
Next Stories
1 मार्केटयार्डातील व्यापाऱ्यावर वार करून रोकड लुटली
2 जोरदार पावसामुळे खडकवासल्यातील विसर्गात वाढ, बाबा भिडे पूल पाण्याखाली
3 अविनाश भोसलेंसह सहा जणांवर गुन्हा
Just Now!
X