17 January 2021

News Flash

पिंपरी-चिंचवड:- रिपाईच्या माजी तालुका अध्यक्षाचा पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू

प्रतिनिधिक छायाचित्र

माझ्यावर अन्याय झाला असं म्हणत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एका व्यक्तीने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अमित माणिक छाजेड याच्यावर चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस कर्मचारी कल्याणी तुकाराम गाडवे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अमित माणिक छाजेड याच्यावर देहूरोड येथील व्यापाऱ्यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल आहे. आज सायंकाळी छाजेड हा पोलीस आयुक्तालयात अचानक आला आणि माझ्यावर अन्याय झाला आहे. खंडणीचा गुन्हा दाखल आहे. असे म्हणून सोबत आणलेली बॉटल तोंडाला लावत फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अमित माणिक छाजेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 1:00 am

Web Title: attempt to commit suicide by drinking phenol at pimpri chinchwad police commissionerate abn 97 kjp 91
Next Stories
1 चिंताजनक : पुण्यात एकाच दिवसात ३७ रुग्णाचा मृत्यू, नव्याने आढळले ८७६ रुग्ण
2 पुण्याचे महापौर करणार प्लाझ्मा दान !
3 मित्राचा खून करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर; गुन्ह्याची दिली कबुली
Just Now!
X