News Flash

“१५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न ; लवकरच निर्णय जाहीर होणार”

उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पुण्यातील पत्रकारपरिषदेत माहिती

नेट-सेट पीएचडी धारकांचं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

“राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. ही बाब लक्षात घेऊन, आम्ही १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.” अशी माहिती राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज(रविवार) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी उदय सामंत म्हणाले, “सध्या राज्यातील विद्यार्थी आणि पालक यांना महाविद्यालयाकडून होणार्‍या शुल्काच्या मागणीचा विचार करिता, त्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश खासगी संस्थासाठी एफआरए निर्णय घेणार आहेत. यासाठी विजय आचलायी हे अध्यक्ष आहेत. विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाची सीईटी ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. मात्र जोपर्यंत बारावीचा निकाल येत नाही. तोपर्यंत सीईटीचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही.”, असे त्यांनी सांगितले.

तसेच, “मागील काही दिवसांपासून पुण्यात प्राध्यापकांनी आंदोलन सुरू केले होते. ते आता मागे घेतले असून पुढील आठवड्यात राज्यात ३ हजार ७४ पदांची भरती होणार आहे. या भरती संदर्भात येत्या दोन दिवसांत वित्त विभाग आणि अजित पवार निर्णय घेतील.” अशी देखील यावेळी उदय सामंत यांनी माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 2:34 pm

Web Title: attempt to start college academic year from september 15 the decision will be announced soon higher education minister uday samantmsr 87 svk 88
Next Stories
1 मास्क लावून केला झोल! दुसरीच बाई केली उभी; पत्नीची संपत्ती परस्पर केली नावावर
2 Pune Lockdown Guidelines : पुणे महानगरपालिकेने जारी केली नवी नियमावली! वाचा सविस्तर
3 OBC reservation : भाजपा कार्यकर्ते आक्रमक; एक तास पुणे-मुंबई महामार्ग रोखला!