पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीतील लेखक पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. घरात हस्तलिखिते आणि पुस्तके सोडून काहीच नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी देखील पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला होता.

भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पु. ल. देशपांडे यांचे घर आहे. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास ७ ते ८ चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून पु. ल. देशपांडेंच्या घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व सामानांची उलथापालथ केली. पण घरात किमती ऐवज नव्हता. पुलंनी लिहिलेली काही हस्तलिखिते व पुस्तकेच फ्लॅटमध्ये होती. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या इमारतीतील या फ्लॅटशिवाय आणखी तीन फ्लॅटही फोडण्यात आले.

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

सध्यातरी घरातून काय चोरीला गेलंय याबाबत सांगता येणार नसल्याचे पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी बोलताना सांगितले. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलल्याचेही दिसून आले. शेजारील फ्लॅटमधील किती ऐवज चोरीला गेला याचा डेक्कन पोलीस शोध घेत आहेत.