पुण्यातील बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे होळी पौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात १०० किलो द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली. द्राक्षांचे घड, विविध प्रकारची पाने व फुलांचा वापर करुन ही सजावट साकारण्यात आली होती.

पंढरपूर येथील व्यावसायिक प्रकाश कुलकर्णी यांच्यातर्फे ही आरास करण्यात आली. सुभाष सरपाले यांनी सजावट केली होती. होळी पौर्णिमेनिमित्त साकारलेली आरास सोमवार, दिनांक २९ मार्चपर्यंत असणार आहे. तर, होळीनिमित्त ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते दत्तयाग होणार आहे.

mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी यांनी सांगितले, की होळी पौर्णिमेनिमित्त दत्तमहाराजांना हा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. कार्निशन, ऑर्चिड, अ‍ँन्थोरियम, जिप्सो यांसह हिरव्या पानांचा देखील आरास करण्याकरीता वापर करण्यात आला. द्राक्षांचा प्रसाद मंदिरात येणा-या भाविकांना तसेच सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.