08 August 2020

News Flash

जावई सन्मानासाठी ऑडी, फॉर्च्युनर आणि १२ बुलेट

एक ऑडी, एक फॉर्च्युनर, १२ बुलेट अशी वाहने जावई सन्मान म्हणून देण्यात आल्या...

रावेत येथील एका विवाह सोहळ्यात जावई सन्मान म्हणून देण्यात आलेल्या मोटारी व वाहने

एखाद्या वाहन कंपनीच्या प्रशस्त दालनात रांगेने ठेवलेल्या मोटारी आपण पाहिल्या असतील, तशाच पद्धतीने एखाद्या विवाह सोहळ्यात नवी कोरी वाहने लावण्यात आली असतील तर.. रावेत येथे रविवारी झालेल्या एका आलिशान विवाह सोहळ्यात असे चित्र दिसले. या सोहळ्याची पिंपरी-चिंचवड आणि मावळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
एक ऑडी, एक फॉर्च्युनर, १२ बुलेट अशी वाहने जावई सन्मान म्हणून देण्यात आल्या. ओवाळणी करणाऱ्या आत्यासाठी अॅक्टिव्हा आणि इतर पै पाहुण्यांसाठी सोन्याच्या अंगठय़ा देण्यात आल्या.
चिंचवड परिसरातील एक बडे घराणे आणि मावळातील एका दिलदार व हौशी इसमाचे तालेवार घराणे यांच्यात नातेसंबंध जोडणारा हा विवाह सोहळा महामार्गालगतच्या एका प्रशस्त मंगल कार्यालयात पार पडला. पै-पाहुण्यांची मोठी उपस्थिती असलेल्या या सोहळ्यासाठी दूरदूरवरून नातेवाईक आले होते. येथील प्रथेप्रमाणे तास-दीड तास उशिराने विवाह लागला. आमदार-खासदार व परिसरातील दिग्गज मंडळींची या वेळी आवर्जून उपस्थिती होती. जावई सन्मान म्हणून इतर सोपस्कार पार पडलेच, शिवाय जावयास एक ऑडी देण्यात आली. अन्य एका जावयास फॉर्च्युनर देण्यात आली. भावकीतील इतर जावयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे १२ बुलेट देण्यात आल्या. इतर पाहुणे मंडळींचा असाच तोलामोलात मान-सन्मान करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2015 3:29 am

Web Title: audi honor bullet wedding
टॅग Honor
Next Stories
1 कात्रज, नगर रस्ता, धनकवडी व मध्य पुणे मुलींच्या लिंग गुणोत्तरात पुढे!
2 पुणे रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट यंत्र
3 चिंचवडचे नामकरण चापेकरनगर करावे – वा. ना. उत्पात
Just Now!
X