14 July 2020

News Flash

भूमिकेपेक्षा प्रेक्षकांची आवड महत्त्वाची

माझ्यातील उणिवा ओळखून त्यातून बाहेर पडण्यासाठी आई-वडील आणि भावाची साथ खूप मोलाची ठरली.

रोटरी क्लब पुणे साऊथच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रोटरी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुक्ता बर्वे यांच्या हस्ते रविवारी झाले. रवी धोत्रे, अभिजित जोग आणि नंदिनी जोग या वेळी उपस्थित होत्या.

मुक्ता बर्वे यांचे मत

पुणे : प्रेक्षकांना सकस कलाकृती बघायला आवडतात. त्यामुळे काय चांगले करू शकते, यापेक्षा प्रेक्षकांना मला कोणत्या भूमिकेत बघायला आवडेल हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे असते, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी रविवारी व्यक्त केले.

रोटरी क्लब पुणे साऊथच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रोटरी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुक्ता बर्वे यांच्या हस्ते झाले. रोटरीचे प्रांतपाल रवी धोत्रे, रोटरी क्लब पुणे साऊथचे अध्यक्ष अभिजित जोग, नंदिनी जोग आणि डॉ. उदय देवासकर या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने राजेश दामले यांनी मुक्ता बर्वे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

युवा पिढीची भक्ती बर्वे या वामन केंद्रे यांनी केलेल्या गौरवाबद्दल विचारले असता मुक्ता बर्वे म्हणाल्या, त्यांच्याएवढी माझी कुवत नाही.  परंतु माझ्यामुळे त्यांची आठवण येते याचा नक्कीच खूप आनंद होतो. पालकांची जागरूकता माझ्यासाठी महत्त्वाची ठरली. माझ्यातील उणिवा ओळखून त्यातून बाहेर पडण्यासाठी आई-वडील आणि भावाची साथ खूप मोलाची ठरली. जे केले तेच मुळी आनंदाने. त्यामुळे मला संघर्ष करावा लागला नाही. अभिनय क्षेत्रातील सुरुवातीचा काळही सहजतेने स्वीकारला. समाज माध्यम हे माध्यम प्रभावी आहे. पण माझे मत मांडेन आणि त्यासाठी भांडेन असा माझा स्वभाव नाही. मला जे वाटते ते लोकांना पटावे असा अट्टाहासही नाही.

सामाजिक कार्यासाठी अधिक कदम यांचा या वेळी गौरव करण्यात आला. या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या ‘माणूस वाचतोय’ या शिल्पाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

दुसऱ्या सत्रात ‘शब्दवेध पुणे’तर्फे ‘अपरिचित पुलं’ हा कार्यक्रम ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, प्रसिद्ध गायक चंद्रकांत काळे आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी सादर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 2:52 am

Web Title: audience choice is more important than the role says mukta barve zws 70
Next Stories
1 भाजपाला बसणार धक्का; जयसिद्धेश्वर शिवाचार्यांची खासदारकी धोक्यात
2 पुणे : मौजमजा करण्यासाठी प्रोफेशनल डान्सरसह तिघांनी चोरल्या 25 दुचाकी
3 ‘ते’ मनसे कार्यकर्ते अडचणीत; पकडलेल्या नागरिकाने केली पोलिसांत तक्रार
Just Now!
X