ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना रुपवेध प्रतिष्ठानचा २०१९ चा तन्वीर पुरस्काराने तर, महाराष्ट्र कल्चरल सेंटर संस्थेला तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराने आज पुण्यात गौरविण्यात आले. जेष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, रत्ना पाठक शाह आणि रूपवेध प्रतिष्ठानच्या कार्यवाह दीपा लागू यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

मी हा माझा खूप मोठा सन्मान समजतो. मला खूप आनंद होत आहे आणि अभिमान देखील वाटत की मला या सन्मानासाठी पात्र समजले, अशी भावना नसीरुद्दीन शाह यांनी यावेळी व्यक्त केली.

मागील पंधरा वर्षापासून रुपवेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिने सृष्टीतील कलावंताना तन्वीर सन्मान आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदाचा २०१९ चा तन्वीर सन्मान जेष्ठ अभिनेते ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, तर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेला जाहीर करण्यात आला होता. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.