पुणे : करोना विषाणू संसर्गाच्या जनजागृतीसाठी आता तरुण कलाकारांनी ‘एकटं कोणी नाहीये’ आणि ‘पोलिस रॅप’ या दोन रॅप गाण्यांमधून सामाजिक संदेश दिला आहे.

‘काळ थोडा बिकट आहे, पण एकटं कोणी नाहीये’ अशा ओळी असलेले रॅप गाणे नुकतेच समाजमाध्यमांद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याचे दिग्दर्शन अनुपम बर्वे यांनी के ले आहे. या गाण्याविषयी बर्वे म्हणाले, की राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने प्रयास या संस्थेकडे ‘करोना’विषयी जागृती करण्यासाठी दृकश्राव्य माध्यमात काय करता येईल या बाबत विचारणा के ली. त्यानुसार भेदभाव, अफवा टाळण्यासह यंत्रणेचा आदर करण्याचा साधासोपा संदेश देणारी ध्वनिचित्रफिती तयार के ली. अमेय वाघ, पर्ण पेठे, अभय महाजन, क्षितिश दाते, सुव्रत जोशी, सखी गोखले, शिवराज वायचळ, ऋतुराज शिंदे यांच्यासह ४५ हून अधिक कलाकारांनी आपापल्या घरी राहून के लेल्या चित्रीकरणाचे गाण्यासाठी संकलन केले.  सुजय जाधवने गीतलेखन, सौरभ भालेराव यांनी त्याचे संगीत संयोजन, विशाल बाठे यांनी संकलन के ले आहे, तर पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे यांनी हे रॅप गाणे गायले आहे.

तर ‘थोडी इज्जत दिखा एक सॅल्युट तो कर, पुलिसवाला भी है इन्सान वो भी पडता है बिमार’ असे शब्द असलेल्या पोलिस रॅप या गाण्यातून अभिनेता लेखक जितेंद्र जोशी यांनी पोलिसांना अभिवादन केले आहे. जितेंद्र जोशी-रेवा जोशी यांनी गीतलेखन के ले आहे, तर डब शर्मा यांनी त्याचे संगीत दिग्दर्शन के ले असून, जितेंद्र जोशी यांनी गाणे गायले आहे. समित कक्कड यांनी या ध्वनिचित्रफितीचे दिग्दर्शन के ले आहे.