माती हेच माझे जीवन आहे. मातीमध्येच काम करण्यासाठी शाळा सोडली. माती हेच माझे जीवन झाले. गणेशमूर्ती करताना केवळ तेवढय़ावरच न थांबता शिल्प घडविण्याचा ध्यास घेतला. साठ वर्षांच्या कारकिर्दीत साडेचारशे पुतळे घडविता आले. मातीमध्येच आयुष्य व्यतीत करता आले याचाच आनंद आहे.. ही भावना आहे ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. खेडकर यांची.
नऊ फूट उंचीच्या पुतळ्यापासून ते साडेअठरा फूट उंचीचा अशी छत्रपती शिवाजीमहाराजांची ३४ शिल्पे घडविणारे.. के. आसिफ यांच्या ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटासाठी कलादिग्दर्शनामध्ये योगदान देणारे.. नटांच्या डमीसाठी हुबेहूब त्याच चेहऱ्याचे मुखवटे तयार करण्याचे कसब चित्रपटसृष्टीमध्ये रुजविणारे बी. आर. खेडकर बुधवारी (१२ ऑगस्ट) ९० व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. मी जी स्वप्ने पाहिली ती पूर्ण करता आली. त्यामुळे कलाजीवनाविषयी मी समाधानी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
१६ वर्षांपूर्वी अर्धागवायूचा झटका आला. त्याचा परिणाम माझ्या उजव्या हातावर झाला. त्यामुळे काम करण्यावर मर्यादा आल्या. मात्र, एकाच डाव्या हाताने मी या कालावधीत दीडशे पुतळे घडवू शकलो, असे खेडकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजीमहाराज यांचा हा अश्वारूढ पुतळा गेल्या वर्षी केला असे एका शिल्पाकडे बोट दाखवित त्यांनी सांगितले. आता देखील मार्चमध्ये पुन्हा एकदा अर्धागवायूचा झटका आल्यामुळे प्रकृती पुरेशी साथ देत नाही. मातीमध्ये हात घालता येत नाही याची रुखरुख वाटते, असेही त्यांनी सांगितले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खेडकर यांच्या बोलण्यामध्ये खंड पडत असल्याने कन्या प्रतिभा ओव्हाळ यांच्या मदतीने त्यांनी संवाद साधला. मला मुलगा नाही याची कधी खंत वाटली नाही. माझी कन्या सीमा खेडकर-शिर्के ही माझा शिल्पकलेचा वारसा चालवीत आहे याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.
वयाच्या सातव्या वर्षीपासून मी मातीकाम करतो आहे. शाळेत जात असताना एसएसपीएमएस संस्थेच्या आवारातील शिल्पकार विनायक करमरकर यांनी घडविलेले छत्रपती शिवाजीमहाराजांचे शिल्प पाहून मला प्रेरणा मिळाली. मला कोणी गुरू नाही. एकलव्याप्रमाणे मीदेखील शिल्पकलेची साधना केली. त्यासाठी शाळा सोडली. मातीच्या गोळ्यामध्ये प्राण ओतण्याचे काम करून शिल्प घडवितानाचा आनंद हेच कामाचे सार्थक असते. कोल्हापूर म्हणजे करवीर ही कलेची नगरी. असे असताना शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजीमहाराजांचे शिल्प करण्यासाठी मलाच बोलावण्यात आले होते. एखाद्या कलाकारासाठी याहून अधिक काय हवे असते. माझ्या कलेची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले. पण, माझे पुरस्कार हे देशात आणि परदेशामध्ये शहरांची शोभा वाढवित आहेत याचा आनंद अधिक असल्याचेही खेडकर यांनी सांगितले.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…