‘मी आजही माझ्या शैलीच्या शोधात आहे. मी अंतर्मनाच्या शांतीसाठी चित्र काढतो, कुठल्याही मानमान्यतेसाठी नव्हे. चित्र हे माझ्यासाठी ध्यानासारखे आहे. ते मला विश्रांत करते. कोऱ्या कॅनव्हाससमोर मी उभा राहतो आणि चित्र माझ्यातून झऱ्यासारखे वाहू लागते..’
हे मनोगत आहे चित्रकार आर. व्ही. ऊर्फ बाबा पाठक यांचे! ते शनिवारी (१३ जून) वयाची १०१ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांची श्रवणशक्ती कमी झाल्याने त्यांच्या कन्या राणी साठे यांनी त्यांचा जीवनपट उलगडला.
‘‘बाबा सातारा जिल्ह्य़ातील औंध संस्थानमध्ये जन्मले. वयाच्या ९४ व्या वर्षांपर्यंत ते चित्र रेखाटायचे. आता मात्र हात थरथरत असल्याने ते चित्रे काढत नाहीत. स्वातंत्र्यापूर्वीच्या औंध संस्थानाच्या या भागात पंतप्रतिनिधींसारख्या कर्तबगार, कलाप्रेमी आणि गुणग्राहक संस्थानिकामुळे अनेक चित्रकार-शिल्पकार उदयास आले. देवधर मास्तर, माधवराव सातवळेकर, व्ही. के. पाटील हे बाबा पाठकांचे आद्य कलागुरू. पुढे परिस्थितीवशात बाबा पाठक बडोद्याला ‘कलाभवन’मध्ये दाखल झाले आणि त्यांनी चित्रकारितेतील पदविका प्राप्त केली,’’ असे राणी साठे म्हणाल्या.
‘त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या नावे अटकेचे वॉरंट निघाल्याने ते काही वष्रे भूमिगत झाले. पुढे आíथक चणचणीतून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी स्वत:चे कलाप्रेम, प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा संगम साधत कोल्ड सिरॅमिक्स आणि म्यूरल्स तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कलाकृती देशात सर्वत्र तसेच हाँगकाँग, दुबई, सिंगापूर येथेही विराजमान झाल्या. व्यावसायिक यश मिळू लागले. यशाचा हा आलेख चढत असतानाच बाबांना त्यांची मूळ कलाप्रेरणा असणारी चित्रकला खुणावत होती. त्यांनी आपला यशोशिखराकडे जात असलेला व्यवसाय थांबवला आणि चित्रकलेत स्वत:ला गुरफटून घेतले. चित्रकलेवरील प्रेमापोटी ते जगभर फिरले. निसर्गाची नानाविध रूपे त्यांनी चित्रांकित केली. मॉनेट, व्हॉन गॉग, तुलुस लोट्रेक, देगा हे त्यांचे आवडते विदेशी कलाकार, तर भारतीय चित्रकारांमध्ये एन सी बेंद्रे यांचे काम त्यांना आवडते. जलरंग, पेस्टल, तलरंग अशा माध्यमांतून त्यांनी काम केले,’ असेही राणी साठे यांनी सांगितले.

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
chavadi maharashtra political crisis
चावडी : राणे आणि भुजबळांची वेगळी तऱ्हा
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?