News Flash

VIDEO: ९८ वर्षांचे बाबासाहेब पुरंदरे संघाच्या पथसंचलनात झाले सहभागी

पुण्यातील सह्याद्री मैदानावर संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते

बाबासाहेब पुरंदरे

आज देशभरामध्ये दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे कार्यक्रम देशभरातील वेगवेगळे भागांमध्ये पार पडले. पुण्यातही असाच संघाच्या पथसंचलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्रभूषण पुरस्कार विजेते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेही सहभागी झाले होते. पुरंदरे यांचा संघाच्या पोषाखातील या कार्यक्रमामधील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

दसऱ्याच्या निमित्ताने पुण्यामधील पर्वती येथील लक्ष्मीनगरच्या सह्याद्री मैदानावर संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. मागील अनेक दशकांपासून संघाचे सदस्य असणाऱ्या पुरंदरे यांनी या संचलनाला आवर्जून हजेरी लावली. वयाच्या ९८ व्या वर्षी पुरंदरेंनी संचलनाला उपस्थिती लावत दाखवलेल्या उत्साहाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. संघाच्या पोषाखात संचलनामध्ये सहभागी होण्यास आलेल्या बाबासाहेब यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले.

याच वर्षी पुरंदरे यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला आहे. मागील ८४ वर्षांपासून पुरंदरे शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत जाणता राजा हे नाटक पुरंदरेंनी जगभरात पोहचवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 12:19 pm

Web Title: babasaheb purandare attended rss dussehra celebration pune scsg 91
Next Stories
1 VIDEO: महालक्ष्मीला नेसविण्यात आली १६ किलोंची सोन्याची साडी
2 पुण्यात होणार ‘राज’गर्जना; मनसेला मैदान मिळालं
3 काँग्रेस बंडखोरांची माघार
Just Now!
X