11 August 2020

News Flash

तळहाताएवढय़ा बाळाचा जीव वाचला!

साधारणत: २८, २९ आठवडय़ांनंतरचे बाळ वाचण्याची शक्यता वाढते, असेही डॉ. पारीख यांनी सांगितले.

अवघे ५७० ग्रॅम वजन आणि आकार मोठय़ा माणसाच्या तळहाताएवढा..मातेच्या गरोदरपणाच्या २६ व्या आठवडय़ात जन्मलेल्या या अर्भकाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
जूनमध्ये जन्मलेल्या या बाळाला १०० दिवस रुग्णालयात राहावे लागले असून आता त्याचे वजन ३ किलो झाले आहे. मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांचे अवयव पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी तयार झालेले नसतात. त्यांची फुफ्फुसे फुलत नसल्यामुळे त्यांना जन्मल्यानंतर लगेच व्हेंटिलेटरची गरज भासू शकते, असे या बाळाच्या उपचारात सहभागी असलेले कोलंबिया एशिया रुग्णालयातील नवजात अर्भक तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘बाळ मुदतपूर्व जन्मल्यामुळे त्याच्या फुफ्फुसात ‘सरफॅक्टंट’ हा घटक तयार झालेला नसतो व त्यामुळे बऱ्याचशा बाळांना दम लागतो. अशा बाळांना थेट पुफ्फुसात हा घटक औषधस्वरूपात दिला जातो. अशा बाळांचे आतडेही मातेचे दूध घेण्यासाठी पुरेसे तयार नसल्यामुळे अपचन टाळण्यासाठी दूध देणे हळूहळू वाढवावे लागते. मधल्या काळात कुपोषण टाळण्यासाठी त्यांना मोठय़ा शिरेतून सलाइनसारख्या माध्यमातून ग्लुकोज, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, लिपिड्स द्यावे लागतात. बाळाला सुरुवातीला काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर त्याला ‘कंटिन्यूअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर’ या श्वसनाला मदत करणाऱ्या मशीनच्या साहाय्याने ठेवले जाते. या बाळांचे मूत्रपिंड विकसित नसल्यामुळे दक्षता घेऊन क्षार द्यावे लागतात. मुदतपूर्व जन्मल्यामुळे बाळांची त्वचा अगदी पातळ व नाजूक असते आणि ती पटकन फाटू शकते, तसेच त्वचेतून पाणी उडून जाण्याचे प्रमाण अधिक असते. या गोष्टींचीही दक्षता घ्यावी लागते. रोगप्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे या बाळांना संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे सर्वात आवश्यक आहे.’
२३ आठवडय़ांच्या आतील बाळांना तग धरण्याच्या दृष्टीने धोका असतो, तर २३, २४ व २५ आठवडय़ांच्या बाळांना योग्य वेळी व चांगली वैद्यकीय मदत मिळाल्यास ५० ते ६० टक्के बाळे वाचू शकतात. साधारणत: २८, २९ आठवडय़ांनंतरचे बाळ वाचण्याची शक्यता वाढते, असेही डॉ. पारीख यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 3:25 am

Web Title: baby of 570 gm wt
Next Stories
1 ‘विश्वमोहिनी वेब अॅप’ तीन महिन्यांत सातशेहून अधिकांकडून ‘डाऊनलोड’ !
2 सारंगीसवे रंगली तान अन् मंत्रमुग्ध करणारी सतार
3 बेशिस्त वाहनचालक पळवताहेत पोलिसांचे ‘जॅमर’
Just Now!
X