30 March 2020

News Flash

बाळासाहेब ठाकरे कमळाबाई ला वाकवायचे;आता उलट चालले आहे- अजित पवार

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना राहिली नाही

भाजपाने कितीही ताणले तरी शिवसेना आणि भाजपा पक्षाची शंभर टक्के युती होणारच. शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिवसेनेला भाजपा शिवाय गत्यंतर नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना राहिली नाही. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे कमळाबाई ला वाकवायचे, सरळ करायचे परंतु आता उलट चालले आहे. असे म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, राजे, सरसेनापती आणि काही नेते भाजपा पक्ष्यात गेलेले आहेत. परंतु, मी डगमगलो नाही आमच्या बरोबर कार्यकर्ता आहे. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणत पक्षांतर केलेल्या नेत्यांवर माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.

अजित पावर म्हणाले, की वेगवेगळ्या कारणांमुळे पक्षांतर होत आहे. तिसरा टप्प्यात अजून काही पक्षांतर करतील. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊद्या. पण, पुन्हा आपलं सरकार आलं तर दादा जाऊद्या पक्ष्यात परत घ्या अस सांगायला येऊ नका. मी तर घेणार नाहीच पण, तुम्हीही आग्रह करू नका. नाहीतर जाऊ द्या हो दादा घ्या पदरात पण, पदर पार फाटला असं म्हणत पक्षांतर करणाऱ्यांना अजित पवार यांनी चिमटा घेतला. दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याचे सांगत त्यांच्या नावावर तिसरीच पावती फाडत असल्याचे अजित पवार म्हणाले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणी रुसायच नाही किंवा फुगायच नाही. नाराज होऊ नका, ज्यांना तिकीट दिल जाणार नाही त्यांना दुसरीकडे संधी दिली जाईल असे अजित पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 12:14 am

Web Title: balasaheb thackeray shiv sena alliance ajit pawar abn 97
Next Stories
1 Video : गप्प बसा… आता जर कोणी घोषणा दिली तर तिकीटच देणार नाही : अजित पवार
2 पुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढवणार, तीन जागा काँग्रेसला : अजित पवार
3 …म्हणून ते सगळे पक्ष सोडून गेले; अजित पवारांनी केला गौप्यस्फोट
Just Now!
X