21 January 2021

News Flash

बालभारतीकडून अभ्यास गट बरखास्त

बालभारतीच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल करून अभ्यास मंडळ हे नाव बदलून विषय समिती आणि अभ्यास गट करण्यात आले.

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने (बालभारती) अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत. राज्यातील सत्ताबदलानंतर भाजपच्या काळातील नियुक्त विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आले असून, आता नव्याने नेमल्या जाणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित सदस्यांचा समावेश असण्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यावर, विनोद तावडे शिक्षणमंत्री झाल्यावर पहिली ते बारावीचा नवा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विषय समित्या आणि अभ्यास गटांची पुनर्रचना करण्यात आली. बालभारतीच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल करून अभ्यास मंडळ हे नाव बदलून विषय समिती आणि अभ्यास गट करण्यात आले.

२०१४ ते २०१८ या कालावधीत नव्या विषय समित्या आणि अभ्यास मंडळांची नेमणूक करण्यात आली. नव्या नेमणुकीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. या नेमणुकांमध्ये भाजपसंबंधित सदस्यांची वर्णी लावण्यात आल्याची चर्चा, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झालेले उद्बोधन वर्ग, पुनर्रचित अभ्यासक्रम यावरून वादही निर्माण झाले होते. आता बालभारतीकडून संबंधित विषय समिती आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आल्याचे पत्र संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित सदस्यांना पाठवून दिलेल्या योगदानासाठी आभार मानले आहेत.

आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आधीच्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आले आहेत. पुढील काही काळात नव्या सदस्यांच्या नेमणुका केल्या जातील. त्यात सत्तेतील तीन पक्षांशी संबंधित व्यक्तींची नव्या विषय समित्या आणि अभ्यास गटांमध्ये नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आधी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गटांचे कार्य संपल्यामुळे संबंधित सर्व विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आले आहेत. आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची निर्मिती होणार असल्याने नवीन अभ्यास गट नियुक्त केले जातील.    – दिनकर पाटील, संचालक, बालभारती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 3:21 am

Web Title: balbharati dismissed subject committees and study groups appointed for curriculum development zws 70
Next Stories
1 ..तर पुण्यात आलातच कशाला?
2 पिंपरीत इंग्लडमधून आलेला प्रवाशी निघाला करोना बाधित; ७० जनांचे रिपोर्ट निगेटिव्ह
3 पुण्यात दिवसभरात २२२ नवे करोनाबाधित, सात रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X